Home / आरोग्य / प्रत्येक मुलीला माहित असावे काखेतील काळे डाग दूर करण्याचे उपाय..फक्त दोन मिनिटात करा गोरे!!

प्रत्येक मुलीला माहित असावे काखेतील काळे डाग दूर करण्याचे उपाय..फक्त दोन मिनिटात करा गोरे!!

बहुतेक वेळा आपल्यापैकी अनेक जण काखेतील केस काढत असतात पण अनेकदा काखेमध्ये काळे डाग सुद्धा होत असतात आणि अशा वेळी आपण हे काळे डाग दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो परंतु काही उपाय केल्यानंतर सुद्धा काळे डाग जाण्याचे नाव घेत नाही आणि यामुळे अनेक रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे सुद्धा आपल्या त्वचेला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी असे काही घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत.

या उपायांच्या माध्यमातून तुमच्या असलेले काळे डाग पूर्णपणे सहज निघून जाण्यास मदत होणार आहे ,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

अनेकदा मुली शॉर्ट कपडे घालत असतात अशावेळी काखेमधील काळे डाग जर दिसले तर अनेकांना लाज नाही वाटत असते आणि हीच भावना अनेकदा मुलींचा आत्मविश्वास सुद्धा कमी करत असते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे.

हा उपाय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लिंबू लागणार आहे. आपल्या सर्वांच्या घरी लिंबू सहजपणे उपलब्ध होऊन जातो त्याच बरोबर लिंबू च्या अंगी अनेक औषधी गुणधर्म असतात ते आपल्या त्वचाविकारांवर कार्य करतात त्यामुळे लिंबूच वापर केल्याने जर तुमची त्वचा सूकी झाली असेल तर त्यावर डाग असतील तर त्यावर काळेपण असेल तर या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.

लिंबू मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी असते जे आपल्या शरीराला शरीरावरील त्वचेला चमक येण्यासाठी मदत करत असते. त्यानंतर आपल्याला उपाय करण्यासाठी आलो वेरा जेल म्हणजेच कोरफडचे जेल वापरायचे आहे. कोरफडीचे जेल आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले गेलेले आहे. कोरफडचे अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात ज्या आपल्या शरीरावर काळे डाग पडलेले असतील तर ते काढण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर आपली त्वचा कोमल नरम करण्यासाठी सुद्धा मदत करत असतात म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी कोरफड जेल वापरायचा आहे.

हे दोन्ही पदार्थ एकत्र करून आपल्याला दिवसभरातून एकदा हा उपाय करायचा आहे, असे काही दिवस उपाय केले तर तुमच्या काखेतील काळे डाग पूर्णपणे निघायला मदत होणार आहे त्याचबरोबर अनेक जण काखेतील केस काढण्यासाठी रेजर वापरत असतात आणि अशा वेळी स्किन लाल होऊन जाते,आग सुद्धा होत असते यामुळे जर तुम्ही अशा ठिकाणी कोरफड जेल लावले तर तुमची त्वचा जळत नाही त्वचेवर आग होत नाही. त्वचा नरम व कोमल राहण्यास मदत होते म्हणून तुम्हाला जर तुमचे काखेतील काळे डाग दूर करायची असेल तर हा उपाय अवश्य करा. हा उपाय अतिशय साधा व घरगुती असल्याने त्याचा कोणता दुष्परिणाम आपल्यावर होत नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!