Home / आरोग्य / सुंदर दिसायचंय? या दोन बियांची क्रिम तयार करून लावा, असा वापर करा..

सुंदर दिसायचंय? या दोन बियांची क्रिम तयार करून लावा, असा वापर करा..

आपली त्वचा सुंदर बनवण्यासाठी आपण वेगवेगळी उत्पादने वापरत असतो. तसे पाहायला गेले तर आपल्या सर्वांची त्वचा सुंदर असते आपण सगळे दिसायला चांगलेच असतो परंतु अनेक वेळा आपण आपल्या चेहऱ्याची त्वचेची काळजी हवी तेवढी घेत नाही त्यामुळे काही जणांची त्वचाही तजेलदार दिसते तर काहीजणांच्या चेहऱ्यावर काळे डाग मुरूम पिंपल्स आलेले असतात.

म्हणूनच आपली त्वचा जर तुम्ही दुर्लक्षित केली असेल तर ती त्वचा चमकदार व तहसीलदार बनण्यासाठी आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा असा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या त्वचेवर काही काळे डाग आहेत मुरूम आहे पिंपल्स आहेत ते पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे आणि इतरांप्रमाणे सुद्धा तुमची त्वचा काही दिवसांमध्ये चमकायला लागणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिया सीड्स (Chia Seeds) लागणार आहेत. चिया सीड्स हे बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होऊन जातात. त्वचेशी संबंधित अनेक रोग टाळण्यासाठी हे सीड अँटिऑक्सिडेंट सामग्रीमुळे आपली त्वचा संरक्षण करण्यात सक्रिय भूमिका बजावू शकते. तर आपण चांगली त्वचा मिळविण्यासाठी chia seed नियमितपणे घेऊ शकता.

त्यानंतर आपल्याला आळशीच्या बिया लागणार आहेत. Flax (जवस) असे ही म्हणतात. जवसातले लिग्नान्स आणि ओमेगा 3 फॅटी ॲसीडचे उच्च प्रमाण आपले पोट स्वच्छ ठेवते आणि त्वचा रोगांपासून बचाव करते. त्वचेची जळजळ, पुरळ उठणे, सूज येणे आणि लालसरपणा जवस नियमित सेवन केल्याने कमी करता येतात.

कृती :- एका पातेल्यामध्ये आपल्याला एक चमचा चिया सीड्स आणि एक चमचा आळशीच्या बिया टाकायचे आहे. स्वच्छ धुण घेतल्यातरी चालतील. त्यामध्ये त्यानंतर आपल्याला दोन वाटी गुलाबजल टाकायचे आहे. ते आता गॅस ठेवायचं. मंद गॅस आचेवर थोडेसे उकळून घ्याचे. आपल्याला हे मिश्रण एका कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे गरम झाल्यावर. त्यानंतर जे जेल बाहेर पडेल ते जेल आपल्याला वापरायचे आहे

त्यानंतर आपल्याला एक चमचा जैतुन तेल म्हणजे ऑलिव्ह ऑइल टाकायचे आहे. जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर साजूक तूप सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता त्यानंतर हे सगळे जेल आपल्याला एका डब्बी मध्ये काढायचे आहे, अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे.

हे जेल कसे वापरायचे..?
हे जेल रात्री झोपताना किंवा दिवसभरातून कधीही आपण हे जेल चेहऱ्याला लावू शकता. एकदा का हे जेल चेहऱ्याला लावल्यानंतर अर्धा तास तसेच ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका असे महिनाभर जरी नियमितपणे केली तर चेहऱ्यावरील काळे डाग आहे, पिंपल्स आहेत, मुरूम आहेत, वांग आलेले आहेत ते कमी होण्यास मदत होणार आहे आणि तुमचा चेहरा हळूहळू तजेलदार चमकू लागेल. हा उपाय अतिशय साधा सोपा आणि घरगुती असल्याने या उपायाचे कोणते दुष्परिणाम नाही म्हणून हा उपाय अवश्य करा..

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!