Home / आरोग्य / केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय| पांढरे केस काळे करण्यासाठी अत्यंत सोपा उपाय

केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय| पांढरे केस काळे करण्यासाठी अत्यंत सोपा उपाय

पोस्टीक आहार याचा अभाव कमी झोप, अशा या अनेक कारणांमुळे केस गळती अकाली केस पांढरे होणे या समस्या वाढलेले आहेत आणि या समस्या नाहीशा करण्यासाठी वेळेतच आणि नियमितपणे जर आपण काही घरगुती उपाय केले तर या समस्या पण नियंत्रणात आणू शकतो. असाच गुणकारी घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत.

या उपायासाठी आपल्याला ३ गोष्ठी आवश्यक आहेत. सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे चहा पावडर प्रत्येकाच्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध असते अशीही चहा पावडर दोन चमचे घ्यायची आहे. तुम्ही कोणतीही चहापावडर घेऊ शकता. फक्त यामध्ये इतर घटक नसावेत यामध्ये आलं दालचिनी किंवा मसाल्याचे इतरही पदार्थ मिक्स असलेली चहा पावडर नसावी.

आता या दोन चमचे चहा पावडर एक ग्लास पाण्यात मिक्स करायचे आहे. हे पाणी आपल्याला असेच झाकून १० मिनिटे ठेवायचे आहे दहा मिनिटानंतर परत हे पाणी चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे.आणि आता हे पाणी आपल्याला गरम करायचे आहे.

गरम होत असतानाच यामाद्धे कडीपत्ता टाकायचा आहे.नंतर थोडी हळद टाकायची आहे. यामुळे आपल्या केसातील व्हाईराल इन्फेक्शन कमी होते. आणि महत्त्वाचे म्हणजे कोंडा नाहीसा करण्यासाठी या हळदीचा उपयोग खूपच चांगल्या प्रकारे होतो.

केस गळती चे मुख्य कारण म्हणजे केसांमध्ये अतिरिक्त प्रमाणात कोंडा होणे केस. या पाण्याला आपल्याला चांगल्याप्रकारे उकळी आणायची आहे. साधारणपणे एक ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत हे पाणी उकळायचे आहे. हे तयार झालेले झालेले मिश्रणआपल्याला या ठिकाणी गाळून घ्यायचे घ्यायचे आहे.

तयार मिश्रण थंड झाल्या नंतरच आपल्याला आपल्या केसाला लावायचे आहे. तर हे मिश्रण लावत असताना जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील किंवा टक्कल पडलेली किवा जर तुमचे केस जास्त प्रमाणात कोरडे आणि रुक्ष असतील तर या मिश्रणामध्ये तुम्ही एक चमचा खोबरेल तेल देखील मिक्स करू शकता किंवा जर तुम्हाला वेळ नसेल शाम्पू यामध्ये मिक्स करून यांनी डायरेक्ट केस देखील धुवू शकता. या उपायाने नक्की केस काळे व कधीच तुटणार नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!