Home / आरोग्य / काळा चहा पिणाऱ्यांना ‘हे’ 6 रोग कधीच होत नाहीत.

काळा चहा पिणाऱ्यांना ‘हे’ 6 रोग कधीच होत नाहीत.

आजच्या लेखामध्ये आपण ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हीसुद्धा काळा चहा पीत असाल तर तुमचे कौतुकच आहे. काळा चहा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो त्याचबरोबर अनेक लोक असे आहेत की ते काळा चहामध्ये दूध टाकून पीत असतात यामुळे आपल्या शरीराला हानी पोहोचत असते आणि त्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण सुद्धा देत असतो.

काळा चहा पिल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात आणि अनेक आजारांपासून आपली सुटका सुद्धा होत असताना सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काळा चहा नियमितपणे प्यायल्याने आपला मेंदू चांगला राहतो. काळा चहा प्यायल्याने आपल्या मेंदूला रक्त प्रवाह सुरळीत होतो, त्याजोरावर मेंदूतील रक्त सुद्धा सुरळीतपणे वाहू लागते. जर तुम्ही बौद्धिक कामे जास्त करत असाल तर काळा चहा प्यायल्याने आपला मेंदू स्वस्थ राहतो आणि अधिक जलद गतीने कार्य करू लागतो. त्याचबरोबर तर आपल्याला ताण-तणाव असेल तर आपलं काम तणाव कमी करण्यासाठीसुद्धा काळा चहा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

त्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे कॅन्सर. सध्याच्या काळामध्ये अनेकांना कॅन्सरचा आजार खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. कॅन्सर हा वेगळ्या प्रकारचा असतो आणि त्यांत पोटाचा कॅन्सर असतो ,तोंडाचा कॅन्सर , लिवर कॅन्सर असतो , की किडनी कॅन्सर असतो अशा पद्धतीने वेगवेगळे कॅन्सरचे प्रकार सुद्धा असतात. आपण नियमितपणे काळा चहा प्यायला ने कॅन्सरचा धोका आपल्याला सांभावत नाही. काळा चहा प्यायलाने आपले हृदय सुद्धा मजबूत बनते त्याचबरोबर हृदयातील रक्तभिसरण प्रक्रिया सुद्धा व्यवस्थित होते. जर तुमच्या शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढले असेल तर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी काळा चहा आपल्याला मदत करतो.

जर तुम्हाला गॅस , ऍसिडिटी ची समस्या नेहमी त्रास देत असेल तर ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही नियमितपणे काळा चहा प्यायला पाहिजे. जर तुमचे पोट सारखे दुखत असेल तर अशावेळी कोरा चहा च्या सहाय्याने पोट व वेदना दुखणे थांबू शकते. अनेकांना अतिसार जुलाब , हगवण होते तेव्हा काळा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो कारण की काळा चहा प्यायल्याने आपला शरीरातील जुलाब-अतिसार सारख्या समस्या लवकरच थांबतात.

जर तुम्हाला वेगवेगळ्या त्वचे संबंधित आजार असेल अशा वेळी सुद्धा कोरा चहा महत्त्वाचा ठरतो. अनेकांना कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होत असतात, त्या सुरकुत्या घालवण्यासाठी कोरा चहा आपल्याला उपयुक्त ठरतो. कोरा चहा मध्ये भरपूर प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट घटक असतात यामुळे त्वचे संबंधित जे काही कॅन्सर असतात ते आपल्याला होत नाही.

जर तुमचे वजन वाढले असेल अति लठ्ठपणा निर्माण झाला असेल अशावेळी कोरा चहा प्यायल्याने आपली मेटाबोलिजम सिस्टम म्हणजे चया पचनाच्या प्रक्रिया जलद गतीने होते आणि आपण जे काही पदार्थ खातो ते लवकर पचू लागतात त्याच बरोबर जर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण भरपूर वाढली असेल तर हे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी कोरा चहा आपल्याला लाभदायक ठरतो. या सगळ्या गोष्टींमुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल अशा प्रकारे कोरा चहा पिण्याचे हे सगळे फायदे आहेत.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!