Home / Motivation / या वकिलाची घरची कामवाली बाई जेव्हा ईडली खाऊन वकील होऊन, तिला एका केसमध्ये हरवते पुढे जे घडते ते पाहून…!

या वकिलाची घरची कामवाली बाई जेव्हा ईडली खाऊन वकील होऊन, तिला एका केसमध्ये हरवते पुढे जे घडते ते पाहून…!

कोर्टाचे कामकाज आवरले माझ्या समोरच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. बहुतेक निकाल त्यांच्या बाजूने जाईल असे वाटत होते. कारण त्यांनी बरेच मुद्दे व्यवस्थित अभ्यास करून मांडलेले दिसत होते. थोडावेळ युक्तिवाद यासाठी बरीच मेहनत घेतलेली जाणवत होती. तशी मीही परफेक्ट प्रत्येक गोष्ट केली होती. पण केस माझ्या बाजूने होतीच कमकुवत.! त्यात काही पुरावे समोरच्या वकील मॅडम यांनी मांडले होते. त्यामुळे आमची बाजू आणखी कमकुवत झाल्या सारखी होती. माझ्या अशिलाला कमीत कमी शिक्षा व्हावी म्हणून मी प्रयत्न करून युक्तिवाद केला होता. पुढच्या तारखेला न्यायाधीश निकाल देणार होते. मी माझी कागदपत्रे आवरून फाईल्स घेऊन कोर्ट रूमच्या बाहेर निघाले होते. समोरच्या वकील मॅडम त्यांच्या पक्षकाराशी काहीतरी बोलत होत्या. पक्षकार गेला आणि त्या २ मिनिटे थबकल्या.

तेवढ्यात मी त्यांच्या जवळून पुढे चालू लागले, तसे त्यांनी मला हाक मारली मॅडम, मी वळून पाहिले. जरी आम्ही या केसच्या संदर्भात एकमेकांच्या विरोधात होतो. तरी मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे होते तशा या वकील मॅडम नवीनच होत्या. फार दिवस नव्हते झाले त्यांना वकिलीची सुरुवात करून, पण त्यांचा आक्रमकपणा, युक्तिवाद, समोरच्याला नामोहरण करण्याची हातोटी, आपली बाजू प्रखरतेने मांडण्याचे कौशल्य, समोरच्यातील कच्चे दुवे शोधण्याचे त्यांच्यात असलेली खुबी यामुळे त्या नावारूपाला येत होत्या. त्यांच्याकडील केसेसची संख्या वाढत होती. अजून माझे त्यांच्याशी फार बोलणे झाले नव्हते. पण त्यांच्याशी कधी बोलले नव्हते. मी त्यांच्या पेक्षा बरीच सीनियर होते. माझ्याकडे कामही भरपूर असायचे त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात मी इतका वेळ काढला नव्हता. पण त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा मात्र होती.

आज त्यांनी हाक मारली आणि मी थबकले, काय म्हणता? बोला.. मी हसून प्रत्युत्तर दिले. आणि आम्ही कोर्टाबाहेर हॉटेलमध्ये येऊन बसलो. 2 इडली सांबर, तिने समोरून आलेल्या वेटरला झोकात ऑर्डर दिली. अहो नाश्ता कशाला मी म्हणाले. फक्त चहा घेऊया मला जायचंय घाई आहे. हो मॅडम, मला माहिती आहे पण तुम्हाला इडली देण्याचे खूप दिवसांची इच्छा होती. मला फार फार तर इडली आवडत नाही पण मी गोंधळूनच विचार करू लागले ही का मला इडली देत असेल? माझे गोंधळलेली नजर पाहून तिनेच मला म्हटले अहो तुमच्या इडली मुळेच तर आज मी इथे आहे. मला अजूनच गोंधळायला झाले ही काय बोलते ते समजेना. इतक्यात वेटर इडली घेऊन आला आणि ती टेबलावर माझ्या पुढे सरकवत म्हणाली त
घ्या मॅडम आधी गरमा गरम इडली खा. मग आपण बोलूयात, काहीशा नाराजीनेच मी इडली खाऊ लागले. चव मात्र फर्मास होती इडली सांबर ची.

इडली खाई पर्यंत ती काही बोलली नाही. इडली खाऊन झाल्यानंतर दोन कॉफी वेटरला सांगून माझ्याकडे चेहरा वळवत ती म्हणाली, मॅडम तुम्ही मला ओळखलं नाहीत मी रुक्मिणी. कोण रुक्मिणी हे माझ्या लक्षात येईना. हिचा चेहरा मला पहिल्या दिवसापासून पाहिल्यासारखा वाटत होता. पण इतक्या दिवसांच्या प्रॅक्टीस मध्ये कोणी तरी भेटली असेल कधीतरी असे मी समजायचे. पण ही रुक्मिणी कोण मला आठवेना. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून तीच पुढे म्हणाली. अहो मॅडम, सोनगाव ला तुमचे शेत होते ना त्या शेतात काम करणारी रुक्मिणी आठवते का? मीच ती रुक्मिणी. आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

आणि तिच्यात झालेला फार मोठा बदल पाहून मला आश्चर्य वाटले. अगं, तुझ्यात इतका बदल कसा काय झाला? मी आश्चर्याने विचारले. मला ती त्यावेळची घाबरट, तेल लावून चिप्प केस करणारी, खाली मान घालून काम करणारी ती रुक्मिणी आठवत होती. आणि आता माझ्यासमोर स्मार्ट, धीट, केसांचा यू कट केलेली, दुसऱ्यांना बोलून हरवणारी अशीही रुक्मिणी माझ्यासमोर बसली होती. इतका मोठा जमीन-अस्मानाचा फरक कसा काय झाला? हे जाणून घेण्याची मला उत्सुकता लागली होती.

मी तिच्याकडे बघतच होते तेव्हा ती म्हणाली हा सगळा तुमच्या इडलीचा प्रताप. मला काही समजेना, बाई ग! तु मला म्हणतेय, ते मला समजेल असे सांग बरं जरा. हसून ती म्हणाली, मॅडम तुम्ही सोनगाव ला होता तेव्हा मला इडली कशी करायची ते सांगितले होते. आणि सोबतच माझ्यात आत्मविश्वास निर्माण करून, शिकण्याला कोणतेही वयाचे बंधन नसते हे सांगितले होते. त्यामुळे जिद्दीने आज मी तुमच्या समोर अॅडव्होकेट रुक्मिणी म्हणून बसली आहे. आता तो प्रसंग मला आठवला, त्याचे असे झाले आमची सोनगाव ला थोडीफार जमीन होती. आणि आम्ही तिथे कधीतरी राहण्यासाठी घर बांधले होते. आम्ही तिघे, मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पंधरा ते वीस दिवस आम्ही शहरापासून दूर इथे येऊन राहत होतो. आणि आमच्या शेतामध्ये काम करणारे राम आणि रुक्मिणी ही जोडी होती. दोघेही शेतात खूप कष्ट करायचे. रुक्मिणी घरातील झटपट
आवरून शेतावर यायची. आमचे कधी लक्ष नसायचे शेताकडे पण त्यांनी शेताचे निगा छान ठेवली होती. रामू शेतातून काही घेऊन घरी यायचा, पण रुक्मिणीला मी तेव्हा पहिल्यांदाच पाहिली होते, ती लाजरी बुजरी रुक्मिणी गावंढळ होती. त्यांना एक मुलगा होता. रुक्मिणी त्याच्या मुलावर खूप प्रेम करायची. मुलगाही तिच्याच सारखा होता. रुक्मिणी स्वाभिमान होती, आपल्या मुलाला वळण लावण्यासाठी ती धडपडत होती. नुकताच तो मुलगा शाळेत जाऊ लागला होता वयाच्या मानाने तो हुशार होता त्याची निरक्षर शक्ती अचूक होती. शाळेतल्या मित्रांच्या गमतीजमती आईला सांगत तो आईच्या पुढे मागे फिरायचा. तिथेच तो खेळत असायचा, झाडाखाली बसून अभ्यास करायचा. रुक्मिणी मला घरात मदत करायची त्याचे मी तिला वेगळे पैसे देत होते. तिचा मुलगा तिच्या मागे घुटमळत असायचा.

एके दिवशी ती शेतात काम करत होती. त्या दिवशी मी नाश्त्याला इडली बनवत होते. तिचा मुलगा काही कारणाने घरी आला. मी त्याला सुद्धा एक प्लेट इडली सांबर दिली. सगळे इडली सांबर खात होते. त्याला ते आवडले त्याने ते मिटक्या मारत खाल्ले. दुसर्‍या दिवशी ती कामावर आली तिला काहितरी बोलायचे होते असे मला तिच्या नजरेत दिसले. पण संध्याकाळपर्यंत ती काही बोलली नाही, जाताना मात्र तिने मला विचारले, बाई तुम्ही लेकराला काल काय खायला दिले होते ते कसे करतात ते मला सांगा. त्याला खूपच आवडले. मला त्याचे खूप कौतुक वाटत होते. मी तिला इडली सांबर कसे करायचे ते शिकवले.

तिसऱ्या दिवशी रुक्मिणी कामावर आली ती हसतच तिने एका डब्यात इडली सांबर घेऊन आली होती. इडली सांबर खूप मस्त झालेला त्याला खूप आवडलं. तो मला म्हणाला तुला त्यांच्यासारखे इडली-सांबर बनवता येते, मग तू त्यांच्यासारखे का नाही बनत? त्यांच्यासारखाच बोलायचं त्यांच्यासारखाच राहायचं. अगर रुक्मिणी तू खूप हुशार आहेस. माझ्या सारखी होशील सुद्धा. तू किती शिकलेली आहेस सांग बरं? माझी फक्त अकरावी झाली आणि लग्न झाले बारावीला गेलेच नाही. मी तिला सांगितले तू मनात आणलं तर पुढचे शिक्षण घेऊ शकतेस. हे काय बाई? मी आता शाळेत जायला लागले तर घरचं काम कोण करणार? अगं शाळेत जायची गरज नाही बाहेरून परीक्षा देता येते. पण तुला अभ्यासासाठी थोडा वेळ द्यावा लागेल मी तिला सांगितले आणि ती विचारात पडली. नंतर ती भराभर कामाला लागली. तसेच मी तिला मुक्त विद्यापीठातून बाहेरून परीक्षा द्यायचा फॉर्म कसा भरायचा याची माहिती नेटवरून मिळवून त्याच्या प्रिंट्स काढून तिला दिल्या. आणि बघ तुला हे जमत असेल तर.. आणि दोन दिवसानंतर आम्ही तिथून निघालो ,आणि मी जाताना रुक्मिणीला विचारले, मग काय विचार झाला तुझा? तिने काहीच उत्तर दिले नाही.

पुढे आमच्या व्यापात आम्ही गुंतलो. आम्ही ती सोंग गावची जमीन विकून टाकली. आणि इथे शहराजवळ फ्लॅट घेतले मी प्रॅक्टिस मुळे रुक्मिणीला विसरून गेले पण होते. आणि तीच रुक्मिणी माझ्या पुढे अॅडव्होकेट रुक्मिणी म्हणून बसली होती आणि मला ते सगळे आठवले आणि रुक्मिणी बोलू लागली मॅडम तुम्ही गेल्यानंतर माझा मुलगा मला दररोज म्हणायचा आई तू त्या मॅडम सारखे का नाही होत तिच्या सारखा छान वागायचं छान बोलायचं छान राहायचं, मला तस आवडतं, मग मी माझ्यात बदल करायचा ठरवला.

तुम्ही दिलेला तो फॉर्म मी भरुन बारावीला ऍडमिशन घेतलं. दिवसा काम आणि रात्री अभ्यास करून मी बारावी पास झाले आणि मुक्त विद्यापीठ बीए सुद्धा झाले. आणि मग एलएलबी केले. गेल्या तीन-चार वर्षांपासून मी ज्युनिअरशिप झाले. नंतर सेपरेट प्रॅक्टिस केली. आणि आता माझ्या मुलाला मी आणखीनच आवडते, तोही आता मोठा झालाय कॉलेजला जाणार आहे या वर्षापासून त्यालाही त्याच्या आईचा खूप अभिमान वाटतो. ही सगळी तुमच्या इडली ची कृपा हसत हसत रुक्मिणी म्हणाली. मी आणि माझी इडली नाममात्र. मला तुझा मनापासून अभिमान वाटतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!