Home / Motivation / ह्या म्हाताऱ्या आईने आपली शेवटची इच्छा आपल्या मुलांला सांगितली, आणि पुढे जे झाले ते वाचा.

ह्या म्हाताऱ्या आईने आपली शेवटची इच्छा आपल्या मुलांला सांगितली, आणि पुढे जे झाले ते वाचा.

आज धावपळीच्या जगात आपण एवढे व्यस्त होऊन जातो की आपल्या हे लक्षात येत नाही आपले आई वडील म्हातारे होऊन जातात. लहानपणापासून मोठे होईपर्यंत ते कायम आपल्या सोबत असतात, आणि आपण हे विसरून जातो की, म्हातारपणात त्यांना आपली गरज आहे. अधून मधून प्रेमाने त्यांची विचारपूस करीत जा. त्यांना ही जाणीव करून द्या तुम्ही त्यांच्याबरोबर आहात.

कोणत्याही वयामध्ये असलेल्या माणसाला तीन गोष्टींची गरज असते प्रेम, आदर आणि कोणीतरी काळजी घेणारा हवं असतं.
आता ज्या आईची आणि मुलाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती तुमच्या हृदयाला भिडल्याशिवाय राहणार नाही.

आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडतो आणि तिला अधून मधून भेटायला जात असतो. एके दिवशी त्या मुलाला वृद्धाश्रमातून फोन येतो, “तुमची आई खूप सिरीयस आहे तुम्ही लवकर या” हे ऐकल्यावर मुलगा लगेच वृद्धाश्रमात जातो आणि तिथे जाऊन बघतो तर काय! आपली आई शेवटच्या घटका मोजत आहे. तो आईला विचारतो आई मी तुझ्यासाठी काय करू? तुझी काय इच्छा आहे? आई म्हणते, बाळा ह्या वृद्धाश्रमात पंखे नाहीयेत कृपया तेवढे पंखे बसवून घे. इथे एका फ्रिज ची सुद्धा गरज आहे, ज्यामुळे अन्न खराब होणार नाही. अनेक वेळा मला उपाशीपोटी झोपावे लागले.

मुलाला धक्का बसतो! तो म्हणतो, तू इथे अनेक वर्षांपासून राहते, हे तू मला आधी का नाही सांगितलेस? आणि आता तुझ्याकडे काही तास राहिले असताना तू मला हे का सांगतेय?

आई उत्तरते, “बाळा मी गर्मी सहन केली, भुक सहन केली काही हरकत नाही मला सवय झाली होती”, पण मला भीती वाटते जेव्हा तुझी मुले तुला इथे पाठवतील तेव्हा तू हे सहन करू शकणार नाहीस. हे ऐकल्याबरोबर मुलगा निशब्द होतो आणि ढसाढसा रडू लागतो.

जेव्हा आजचे तरुण आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांबरोबर चुकीचे वागतात त्यांना वृद्धाश्रमात टाकतात, त्यांची काळजी घेत नाहीत. ते हे विसरून जातात की, ते कायमस्वरूपी तरुण राहणार नाहीत ते सुद्धा एक दिवस म्हातारे होणार आहेत. आणि निसर्गाचा एक नियम आहे, “क्रिया तशी प्रतिक्रिया” तुम्ही तुमच्या आई-वडिलांबरोबर जसे वागाल तुमची मुले सुद्धा तुम्ही म्हातारी झाल्यावर तुमच्याबरोबर तशीच वागतील. सध्या तुमची मुले तुमच्या बरोबर नीट वागत नसतील तर स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण आपल्या आई-वडिलांबरोबर कसे वागलो? तुम्हाला उत्तर मिळून जाईल!

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!