Home / आरोग्य / सर्वांत सोपा कृतीसह उपाय केस काळे,लांब होतील, केस गळतीवर घरगुती उपाय.

सर्वांत सोपा कृतीसह उपाय केस काळे,लांब होतील, केस गळतीवर घरगुती उपाय.

नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे,

प्रत्येकालाच आपले केस काळेभोर, घनदाट आणि सिल्की असावेत असे वाटते. परंतु सध्या आपण पाहतो केसाची एकही समस्या नाही अशी व्यक्ती शोधूनही आपल्याला सापडणार नाही. कुणाला केसात कोंडा होणे, केसांची वाढ न होणे किंवा अकाली केस पांढरे होणे या समस्या असतील परंतु समस्या कोणतीही असो जर तुम्ही हा घरगुती उपाय केला तर यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल चला तर मग पाहूया असा हा बहुगुणी उपाय कसा बनवायचा ते.

तर अशा या बहुगुणी उपाय यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत कडुलिंबाची पाने कडुलिंबाची पाने ताजी आपल्याला घ्यायचे आहेत आणि ती पाण्याने स्वच्छ धुऊन देखील घ्यायचे आहेत. जेणेकरून यावरील धूळ माती पूर्ण ी निघून जाईल. अशीही तयार कडुलिंबाची पाने आपल्याला साधारणपणे ओंजळभर घ्यायचे आहेत.

अशीही ओंजळभर पाने मिक्‍सरच्या साहाय्याने आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत. साधारणपणे एक वाटी हे मिश्रण आपल्या बनवून घ्यायचे आहे. असे हे तयार मिश्रण गाळणी च्या सहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचे आहे.

यामध्ये दुसरा घटक आपल्याला मिक्स करायचा आहे तो म्हणजे कोरफड केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि केसातील इन्फेक्शन खाज दूर करून केसाची वाढ देखील चांगल्या प्रकारे होण्यासाठी या कोरफड चा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो. साधारणपणे अर्धी वाटी रसामध्ये दोन चमचे कोरफड गर घ्यायचे आहे.

यानंतर खोबरेल तेल घ्यायचे आहे. बऱ्याच जणांची केस कोरडे वृक्ष आणि कमकुवत असतात अशा केसांसाठी खोबरेल तेलाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो. यासाठी अर्धा चमचा खोबरेल तेल मिक्स करायचे आहे. हे तिन्ही घटक चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे तयार मिश्रण कापडाच्या सहाय्याने किंवा हाताच्या साह्याने आपल्या पूर्ण केसावर आपल्याला लावायचे आहे.

हे मिश्रण तुम्ही आंघोळ करण्यापूर्वी एक ते दोन तास अगोदर लावून केस धुवू शकता किंवा हे मिश्रण रात्री लावून सकाळी देखील केस देऊ शकता. फक्त केस धुताना अति गरम पाणी न वापरता कोमट पाण्याचा उपयोग करावा. अशा प्रकारे काहीही खर्च न करता आठवड्यातून दोन वेळेस आपल्या घरा शेजारील असणाऱ्या या औषधी वनस्पतीचे उपयोग आपल्या केसांसाठी करा आणि केस गळणे केसात कोंडा होणे खाज येणे इन्फेक्शन लिखा याबरोबरच अकाली केस पांढरे होणे केसांची वाढ न होणे असतील किंवा केस गळती असेल या सर्व समस्या दूर करा माहिती आवडल्यास शेअर करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!