Home / आरोग्य / महिलांना हैराण करेल, केसांच्या अनेक समस्या कढीपत्त्याच्या पानांचा असा करा उपाय, केस होतील लांबसडक आणि चमकदार…

महिलांना हैराण करेल, केसांच्या अनेक समस्या कढीपत्त्याच्या पानांचा असा करा उपाय, केस होतील लांबसडक आणि चमकदार…

जर तुम्हाला केसांच्या अनेक समस्या असतील, केस वारंवार तूटत असतील, केसांमध्ये कोंडा झालेला असेल, केस खुपच पातळ झाले असतील तर हे तेल अवश्य लावा. केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण अनेक उत्पादने वापरत असतो परंतु या उत्पादनांचा आपल्या केसांवर विपरीत परिणाम सुद्धा पाहायला मिळतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत..

आणि हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपण कढीपत्त्याची पाने वापरणार आहोत. कडीपत्ता यांचा वापर प्रामुख्याने आपण अन्नपदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी प्रामुख्याने करत असतो त्याच बरोबर जेवणाला स्वाद येण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करत असतो त्याच बरोबर आपले सौंदर्य वाढविण्यासाठी सुद्धा कढीपत्ता मध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपले सौंदर्य चांगले राहते. आपल्या चेहऱ्यावरील त्वचा चमकु लागते, केस मजबूत बनू लागतात , चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा आणि कशा पद्धतीने बनवायचा आहे त्याबद्दल…

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कढीपत्त्याची काही पाने वापरायचे आहे. ही कढीपत्त्याची पाने आपल्याला सुरुवातीला धुवून घ्यायची आहेत जेणे करून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची धूळ साचली असेल तर ती धूळ निघून जाईल व त्याचबरोबर कोणतेही जीवजंतू त्यावर असतील तर ते पूर्णपणे निघून जाणार आहे त्यानंतर ही कडीपत्त्याची पाने आपल्याला स्वच्छ कापडाने पुसुन घ्यायची आहेत आणि त्या नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे.

ही पाने वाटत असताना यामध्ये पाणी टाकायचे नाही. या पानांची चांगली पावडर आपल्याला बनवायचे आहे, ही पावडर मध्यम स्वरूपामध्ये बनवायचे आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी खोबरेल तेल लागणार आहे. खोबरेल तेलही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. या खोबरेल तेलामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला पोषक तत्व प्रदान करत असतात आणि त्याच बरोबर खोबरे मध्ये आपली त्वचा नरम ठेवण्याचे सुद्धा गुणधर्म असतात म्हणून हा उपाय करण्यासाठी आपण खोबरेल तेल वापरणार आहोत.

त्यानंतर आपल्याला मोहरीचे किंवा तिळाचे तेल वापरायचे आहे. मोहरीचे तेल हे आपल्या शरीरातील जे काही वाईट घटक असतात ते घटक बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्याचबरोबर शरीराला सिग्न पदार्थ ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे तिन्ही पदार्थ आपल्याला लागणार आहे त्यानंतर एका वाटीमध्ये खोबरेल तेल टाकून त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता ची पेस्ट टाकायची आहे आणि त्यानंतर मोहरीची किंवा राईचे तेल टाकायचे आहे.

हे मिश्रण व्यवस्थित मिक्‍स केल्यानंतर काही तास तसेच ठेवायचे आहे, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने मुरेल आणि त्यानंतर हे तेल आपल्याला आपल्या केसांच्या मुळाशी लावायचे आहे.हा उपाय केल्याने आपली केस अगदी मजबूत बनणार आहे. केस तुटणार नाही, केस जर विरळ झालेली असतील तर ते दाट हो. अकाली केस पांढरे झाले असतील तर काळे होण्यास मदत होणार आहे.

कारण की कढीपत्त्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने यामुळे केसांना जर अकाली पांढरे पण आले असतील तर यामुळे केस काळे होतात त्याचबरोबर अँटी बॅक्टरियल गुणधर्म सुद्धा असल्याने आपल्या शरीरात जे काही वाईट घटक आहेत. विषाणू आहेत ते बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपली केसांचे आरोग्य चांगले ठेवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!