Home / आरोग्य / कमी पैसे वापरून २० किलो वजन करा घरच्या घरी कमी !! हा आहे एक घरगुती उपचार, अवश्य करून पाहा…

कमी पैसे वापरून २० किलो वजन करा घरच्या घरी कमी !! हा आहे एक घरगुती उपचार, अवश्य करून पाहा…

वजन वाढले आहे ,पोटावर अतिरिक्त चरबी झालेली आहे, काही केल्या वजन कमी होत नाही या समस्या जर तुम्हाला होत असतील तर आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी काही महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत,जेणेकरून या माहितीमध्ये सांगितलेल्या घरगुती उपायाने तुमचे वजन काही दिवसांमध्येच कमी होणार आहे. पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला नारळ लागणार आहे.नारळाची बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. नारळ वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. नारळामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जी आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असतात त्याच बरोबर नारळाचे नियमितपणे सेवन केल्याने आपले पोट भरलेले असते बहुतेक वेळा असे होते की आपण नेहमी जेवण करतो परंतु तरीही आपले पोट रिकामे वाटत असते वारंवार आपल्याला भूक लागते परंतु नारळाचे तसे नाही आहे नारळ खोबरे खाल्ले तर आपल्याला पोट नेहमी भरलेले वाटते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वाटी खोबऱ्याची पावडर घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लिंबू लागणार आहे. हा उपयोग करण्यासाठी आपल्याला लिंबूचा रस व लिंबूची साल लागणार आहे. लिंबू हे आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायी ठरते यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये असते. आपल्या लिंबू ची साली सहित बारीक-बारीक तुकडे करायचे आहे लिंबू मध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून आपल्याला हृदयरोग सुद्धा उद्भवत नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये खोबऱ्याची पावडर टाकायची आहे व कापलेले लिंबू टाकायचे आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे गॅसवर चांगल्या पद्धतीने हे मिश्रण उकळू द्यायचं आहे जेणेकरून लिंबूचा व खोबऱ्याचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरेल त्यानंतर आपल्याला गाळनी सहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे आणि दिवसभरातून एकदा आपल्याला हे मिश्रण प्यायचे आहे असे जर आपण पंधरा ते वीस दिवस केले तर तुमचे वजन लवकर कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

त्याचबरोबर तुमच्या पोटावर अतिरिक्त चरबी जमा झालेली आहे ती चरबी सुद्धा कमी होऊन जाणार आहे. हा उपाय केल्याने तुमचे पोट नेहमी भरलेले राहील त्यामुळे तुम्हाला वारंवार भूक सुद्धा लागणार नाही त्याचबरोबर या उपायांमध्ये लिंबू असल्याने तुम्हाला जर अपचनाच्या काही समस्या असतील तर त्या समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जाणार आहेत म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य चांगले बनवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!