Home / आरोग्य / बाजारातील काजळापेक्षा शंभर पटीने चांगला आहे घरी बनवलेले काजळ… चला तर मग जाणून घेऊया कशा पद्धतीने बनवायचे घरगुती काजळ!!

बाजारातील काजळापेक्षा शंभर पटीने चांगला आहे घरी बनवलेले काजळ… चला तर मग जाणून घेऊया कशा पद्धतीने बनवायचे घरगुती काजळ!!

भारतामध्ये काजळचा उपयोग गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. काजळ हे आपल्या डोळ्यासाठी एक उत्तम रसायन मानले जाते आणि त्याचबरोबर डोळ्यांना सुंदर बनवण्यासोबतच डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सुद्धा काजळ महत्त्वाची भूमिका बजावत असते. काजळ लावल्यामुळे डोळ्यांना अनेक आ-जारांपासून संरक्षण प्राप्त होते. खरेतर बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असणारे हे काजळ आपल्या डोळ्यांसाठी चांगले नसते म्हणूनच आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी घरच्या घरी काजळ बनवण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायला हवा..

घरात अगदी सहजपणे काजळ बनवता येऊ शकते. काजळ बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे म्हणूनच या लेखांमध्ये आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कशा पद्धतीने काजळ बनवायचे आणि काजळाचे नेमके कोणकोणते फायदे आहेत याबद्दल सांगणार आहोत ,चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल…

घरी बनवलेल्या काजळमुळे इंफेक्शनपासून वाचा – घरी बनवलेल्या काजळमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्यापासून संरक्षण प्राप्त होते. एवढेच नाही तर काजळ लावल्याने डोळ्यांच्या ज्या मांस पेशी असतात त्या सुद्धा मजबूत बनतात आणि यामध्ये वे-दना सुद्धा होत नाहीत. खरंतर घरी जे काजळ बनवले जाते त्यामध्ये प्रामुख्याने बदामाचा वापर केला जातो. जे आपल्या डोळ्यांसाठी खूपच चांगले सिद्ध ठरते. ज्या लोकांना नेहमी डोळ्यांमध्ये इ-न्फेक्शन होत राहते अशा व्यक्तीने आपल्या डोळ्यांना काजळ लावणे अतिशय लाभदायक ठरते म्हणून त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये काजळाचा उपयोग अवश्य करायला हवा..

डोळ्यांची स्वच्छता -घरी बनवलेल्या काजळमुळे डोळ्यांची स्वच्छता चांगल्या पद्धतीने होते आणि त्याचबरोबर डोळ्यांमध्ये जमा झालेली घाण सुद्धा बाहेर पडण्यास मदत होते. घरगुती काजळ लावल्याने आपली नजर सुद्धा चांगली बनते आणि नजर भविष्यात कधीच कमजोर होत नाही.

डोळ्यांना मिळतो आराम -घरी बनवलेले काजळ शुद्ध आणि प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक वस्तूंपासून तयार केले जाते यामुळे घरी बनवलेल्या काजळामध्ये कोणतेही रासायनिक पदार्थांचा समावेश नसतो. या कारणामुळे बाजारात मिळणारे काजळ आणि घरी बनवलेले काजळ यामध्ये जमीन-अस्मानचा फरक असतो. घरी बनवलेले काजळ आपल्या डोळ्यांना लावले तर आपल्याला आराम मिळतो आणि डोळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. घरी कशा पद्धतीने बनवावे काजळ.. तीन पद्धतीने काजळ करता येते शेवटी पर्यंत नक्की वाचा.

बदामाचे काजळ.साहित्य: १ – मातीचा दिवा २ – तांब्याची प्लेट ३ – मोहरी किंवा एरंडेलचे तेल४ – बदाम तेल५ – एक छोटीशी डबी६ – कापूस प्रक्रिया :-सर्वात आधी मातीच्या दिव्यांमध्ये तेल टाका आता कापसाची वात बनवून तेलामध्ये भिजवून दिव्यात ठेवा. दिव्याच्या वातीला प्रज्वलित करून त्यावर तांब्याची प्लेट ठेवा. तांब्याची प्लेट आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे की दिवा विझायला नको त्यानंतर या प्लेटवर आपल्याला काही बदाम ठेवायचे आहेत. या बदामला पूर्णपणे जळू द्या त्यानंतर आपलं हे बदाम काढायचे आहेत. जेव्हा बदाम जळून जातील तेव्हा सुरीच्या साह्याने प्लेटच्या खाली जे काळे झालेले आहेत ते आपल्याला काढून एका डब्यामध्ये भरायचे आहे.

कोरफड जेल चे काजळ..साहित्य :-१ – कोरफडीचे जेल २ – मोहरीचे तेल ३ – एक तांब्याची प्लेट ४ – कापूस ५ – दिवा प्रक्रिया :-हे काजळ बनवण्यासाठी सात ते आठ तास लागतात. सर्वात आधी दिवा घ्या आणि त्यामध्ये मोहरीचे किंवा तिळाचे तेल टाका. दिव्यांमध्ये कापसाची वात बनवून ठेवा आता एक प्लेट घेऊन त्यामध्ये कोरफडची जेल टाका.आपल्याला प्लेट अशा पद्धतीने ठेवायची आहे की जेणेकरून कोरफडचे जेल ला उष्णता मिळायला हवी जेव्हा हे जेल पूर्णपणे गरम किंवा जळू लागेल तेव्हा प्लेटच्या खाली जी काजळी निर्माण झालेली आहे ती आपल्याला सुरीच्या सहाय्याने काढायचे आहे आणि एका डबीमध्ये भरायचे आहे. कोरफड काजळ लावल्याने आपल्या डोळ्यांना थंडावा मिळतो.

कापूर चे काजळ साहित्य :-१ – कापूर २ -तांब्याची प्लेट ३ -एक डबी प्रक्रिया :-कापूर ला प्लेट च्या मधोमध ठेवा आणि माचिसच्या साह्याने कापून जळवा.कापूरला पूर्ण जळु द्या. जेव्हा काजळी पूर्णपणे प्लेटवर जमा होऊ लागेल तेव्हा सूरीच्या साह्याने ती काजळी आपल्याला डब्यामध्ये भरायचे आहे.कापुराचे काजळ पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बनवून तयार होऊन जाते आणि या काजळा ला डोळ्यांमध्ये लावल्याने आपल्या डोळ्यांना आराम मिळतो त्याच बरोबर डोळ्यांमध्ये जर धुळीचे कण साचले असतील तर ते सुद्धा बाहेर निघण्यास मदत होते.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!