Home / ठळक बातम्या / घटना स्थळी जाऊन १२ वर्षाच्या चिमुरडीने वाचवले आपल्या आईचे प्रा”ण त्यापुढे जे झाले..

घटना स्थळी जाऊन १२ वर्षाच्या चिमुरडीने वाचवले आपल्या आईचे प्रा”ण त्यापुढे जे झाले..

एक आई प्रत्येक क्षण आपल्या मुलांची जीवापाड काळजी घेते. मुलांची सुरक्षितता असल्याची खात्री करण्याची जबाबदारी आईची आहे. जर पोटच्या पोराचा जीव धो’क्यात असेल तर आई जी’वाची बाजी लावायला पण मागे पुढे पाहत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा मुलीशी परिचय करून देणार आहोत जिने आपल्या आईला वाचविण्यासाठी आपला जी-व धो’क्यात घातला. या १२ वर्षाच्या चिमुरडीने आपल्या आईला मृ’त्यूच्या तोंडातुन बाहेर खेचले. आता प्रत्येकजण या मुलीच्या शौर्याचे कौतुक करीत आहे.

तर घडले असे, रविवारी भोपाळच्या बागेसेवनियाला पो-लीस स्टेशनमध्ये सूचना मिळाली की, हबीबगंज ते बावडिया दरम्यान रेल्वे रुळाजवळ एका महिलेचा मृ’तदेह पडला आहे. त्यांना माहिती मिळताच एएसआय सूर्यनाथ यादव, कॉन्स्टेबल दीपक, हवालदार ब्रिजकिशोर आणि हवालदार लालबाबू घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी रेल्वेच्या ट्रॅकजवळ एका १२ वर्षाच्या मुलीला तिच्या आईच डोकं आपल्या मांडीवर घेऊन र’डताना पाहिले. त्यांनी त्या महिलेची तपासणी केली तेव्हा तिचा श्वास चालू होता.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी तातडीने कारवाई चालू केली आणि बे’शुद्ध महिलेला स्ट्रेचरच्या सहाय्याने ट्रॅकवरून बाजूला काढले. यानंतर महिलेला शहरातील जेपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती गं’भीर असल्याचे पाहून तिला एम्समध्ये पाठवण्यात आले. काही केल्या त्या महिलेला शुद्ध येत नव्हती. तिची प्रकृती अजूनच खालावत चालली होती. दुसरीकडे पोलिसांनी मुलीकडून संपूर्ण घटनेची चौकशी केली असता, पोलीस सुद्धा चिमुरडीच बोलण ऐकून आवाक झाले.

मुलीने सांगितले की माझी आई आत्म’ह’त्या करण्यासाठी रेल्वे रुळावर आली होती. अशा परिस्थितीत मी सुद्धा तिच्या पाठोपाठ आले. आई चालत्या ट्रेनसमोर उभी राहिली, पण नंतर मी मागून आले आणि तिचा हात धरला. पोलिसांनी सांगितले की मुलीने आईला क्षणार्धात आणि घाईघाईने खेचले होते, त्यामुळे ते दोघेही ट्रॅकच्या बाजूला पडले आणि जखमी झाले. मुलीची आई तिथेच बे’शुद्ध झाली. मुलीने तिच्या जीवावर खेळून आईला कसे वाचवले हे ऐकून पोलिसांनीही तिचे खूप कौतुक केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला आ’त्मह’त्या का करावी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही महिला अद्याप बेशुद्ध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिचा कोणताही जबाब नोंदविण्यात आलेला नाही. जेव्हा ती स्त्री शुध्दीवर येईल, तेव्हा याबद्दल सविस्तरपणे काहीतरी कळू शकते, अस पोलीस म्हणत आहेत. पोलिसांनी महिलेची ओळख संगीता म्हणून केली आहे. प्रिया असं त्या चिमुरडीच मुलीचं नाव आहे. त्या दोघीही गौतम नगर येथे राहतात.

सध्या, १२ वर्षांची प्रिया आपल्या बे’शुद्ध आईच्या प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. तिची आई लवकर ठीक व्हावी अशी प्रार्थना आम्हीही करत आहोत. या प्रकारची घटना खरोखर आश्चर्यचकित करणारी आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जीवनात कितीही दु: ख आले तरी आत्म’ह’त्या कोणत्याही स-मस्येचा उपाय नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!