Home / Motivation / ‘सिलेंडर मॅन’रातोरात बनला स्टार,एका रात्रीत फेमस झालेल्या सागरचे पाय मात्र अद्याप जमिनीवरच..

‘सिलेंडर मॅन’रातोरात बनला स्टार,एका रात्रीत फेमस झालेल्या सागरचे पाय मात्र अद्याप जमिनीवरच..

अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे (Cylinder Man) फोटो गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव (Sagar Jadhav)असं या ‘सिलेंडर मॅन’चं नाव असून, सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर हा आता रातोरात स्टार झालाय.

कसे चर्चेत आले सागरचे फोटो?
दोन दिवसापूर्वी सागर सिलेंडरच्या टेम्पोला टेकून उभा असताना त्यांच्या नकळत तुषार भामरे नावाच्या व्यक्तीने त्याचा फोटो क्लिक केला. आणि तो फेस बुक वर पोस्ट केली. त्यावर लिहलं होतं ,एखाद्या वेब सिरीज मधलं कॅरेक्टर वाटावं असे रूप असलेला “सिलेंडर मॅन” सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सागरच्या फोटोच्या लाखो लाईक्स आणि कमेंट्स आणि मिम व्हायरल झाले आहेत. जिद्दीने सागरनं गेल्या 2-3 वर्षात मेहनत करून अतिशय पिळदार शरीरयष्टी कमावली आहे.

कोण आहे सागर जाधव?
12वी नंतर अंबरनाथला काका-काकूंकडे येऊन नोकरीचा शोध सुरू केला. सागर हा लहानपणा पासून अनाथ आहे. तो चांगला इमानदार मुलगा असून त्याच्या या प्रसिद्धी मूळे आम्ही चांगलेच आनंदी झाल्याचे रेणू गॅस एजन्सीचे डॉ शामकांत जाधव म्हणले आहेत. तो सध्या राहत असलेल्या लक्ष्मीनगर(नाशिक) परिसरातच भारत गॅसचं गोडाऊन आहे. याचठिकाणी गेल्या 12 वर्षांपासून सागर नोकरी करतोय. कोणतही काम लहान नसून कामात सचोटी पाहिजे आणि प्रामाणिक पणा, मी या कामात समाधानी असून मला हे आवडत असल्याचे सागर जाधव व्यक्त केलं आहे. सागरच्या घरी त्याचे काका काकू, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे.

सागरचं होतंय कौतुक!
काल पर्यंत गॅसवाला म्हणून त्या परिसरात ओळखल्या जाणाऱ्या सागरला दुसरे “सिलेंडर मॅन” अस नामकरण देखील झाले आहे . सागरनं खूप पुढे जावं आणि नाव कमवावं, असं त्याच्या मित्रांना वाटतं.
त्याचा फोटोला लाखो लाईक आल्याअसून कमेंट्सचा पाऊसच पडला आहे, प्रत्येकजण पिळदार शरीरयष्टीचे कौतुक करत आहे.
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यापासून ते कुशल बद्रिके पर्यंत सर्व नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.
(Sagar Jadhav A cylinder Man from Ambernath photo goes viral on social media)

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!