Home / आरोग्य / लांबसडक केसांसाठी मोहरीच्या तेलामध्ये मिसळा हा एक पदार्थ.! पांढरे केस होतील काळे..

लांबसडक केसांसाठी मोहरीच्या तेलामध्ये मिसळा हा एक पदार्थ.! पांढरे केस होतील काळे..

नमस्कार,

बऱ्याच महिलांना केस तुटणे, केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे यासारखे असंख्य समस्या सतावत असतात. या समस्या दूर करण्यासाठी अनेक महिला वेगवेगळे शाम्पू रसायने पदार्थ नवीन बाजारात आलेले प्रोडक्ट वापरत असतात परंतु या सर्व पदार्थांचा केसांवर कधीकधी विपरीत परिणाम होतो आणि परिणामी केस अजून गळू लागतात., केसांमध्ये कोंडा अजून निर्माण होऊ लागतो.

परिणामी अनेकांना टक्कल पडण्याची समस्या सुद्धा झालेली आहे म्हणूनच या सगळ्या समस्या टाळण्यासाठी आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या माहितीच्या आधारे तुमचे केस पूर्णपणे चांगले होणार आहेत, केसांच्या संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहेत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल….

आपले केस हे आपल्या सौंदर्याचा एक भाग आहे आणि सौंदर्य जपण्यासाठी आपण केसांवर वेगवेगळे उपचार सुद्धा करत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक घरगुती उपचार करणार आहोत. हा उपचार आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूपच महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपण मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल घेणार आहोत. मोहरीचे तेल व तिळाचे तेल आपण मालिश करण्यासाठी सहज वापरत असतो. या तेलामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या केसांच्या वाढीसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ते दोन चमचा मोहरीचे किंवा तिळाचे तेल घ्यायचे त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी अजून एक तेल घ्यायचे आहे ते म्हणजे आवळ्याचे तेल. आवळा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी उपलब्ध असतात, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत व शरीराला पौष्टिक घटक सुद्धा प्राप्त करत असतात व त्याचबरोबर केसांचे आरोग्य मजबूत राहण्यासाठी सुद्धा विटामिन सी मजबूत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

जर तुमचे केस अकाली पांढरे झाले असतील तर ते केसांना काळे करण्याचे काम विटामिन सी करत असते व त्याचबरोबर आवळ्यामध्ये केसांना चकाकी देण्याचे काम सुद्धा करत असते म्हणून आपण हा उपाय करण्यासाठी आवळ्याचे तेल सुद्धा वापरणार आहोत. एक गोष्ट लक्षात असू द्या हे उपाय आपल्याला घरी करायचे आहेत बाजारातून तेल विकत आणायचे नाही. हे तेल एकत्र करून आपल्याला वापरायचे आहे त्याचबरोबर हेच तेल वापरल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारच्या त्वचा विकार असेल तर तो त्वचा विकार दूर करण्यासाठी सुद्धा मदत होत असते.

अनेकदा आपल्या स्कलपची त्वचा कोरडी झाल्यामुळे सुद्धा केसांमध्ये कोंडा निर्माण होऊ लागतो आणि परिणामी अनेक केस तुटू लागतात, गळू लागतात म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला शक्यतो रात्री करायचा आहे आणि रात्री केसांना तेल लावून सकाळी आपण स्वच्छ पाण्याने धुतले तरी चालेल कोणताही उपाय करत असताना त्याचे परिणाम प्राप्त होण्यासाठी थोडासा वेळ सुद्धा लागतो त्याच पद्धतीने हा उपाय केल्यानंतर तुमचे केस केस हळूहळू कमी होणार आहे .

केसांचा कोंडा कमी होणार आहे त्याचबरोबर अकाली केस पांढरे झाले असतील तर त्या केसाना सुद्धा काळा रंग प्राप्त होणार आहे म्हणूनच आपले केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हा उपाय महिनाभर तरी जरूर करा. हा उपाय केल्याने तुमच्या केसांच्या संदर्भातील सर्व समस्या पूर्णपणे दूर होणार आहेत म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!