Home / आरोग्य / शाम्पू मध्ये फक्त मिसळा या दोन वस्तू तुमचे केस एवढे वाढतील की सांभाळणे सुद्धा होणार नाही..

शाम्पू मध्ये फक्त मिसळा या दोन वस्तू तुमचे केस एवढे वाढतील की सांभाळणे सुद्धा होणार नाही..

शाम्पू मध्ये फक्त मिसळा या दोन वस्तू.. तुमचे केस एवढे वाढतील की सांभाळणे सुद्धा शक्य होणार नाही. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत यामुळे तुमचे केस चमकदार बनणार आहे. त्याचबरोबर केसांची लांबी वाढवण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. अकालीने पांढरे झालेले केस आहेत ते देखील काळेभोर होऊन केस दाट, सुंदर, चमकदार व लांबसडक होण्यास मदत होते.

आपल्यापैकी प्रत्येक जण शाम्पू करताना काही पदार्थ वापरत असतात परंतु आपण शाम्पू आठवड्यातून एकदा करतो किंवा काहीजण दोनदा करत असतात, काहीजण तीनदा सुद्धा करत असतात. चला तर मग जाणून घेऊया शाम्पू करताना आपल्याला कोणत्या वस्तू मिक्स करायचे आहे त्याबद्दल….

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करायचे आहेत म्हणून वाटीमध्ये थोडे पाणी मिक्स करायचे आहे कारण की जर तांदुळाला कोणत्या प्रकारचे जंतुनाशके व धूळ असेल तर ती पाण्याच्या माध्यमातून निघून जाणार आहे त्यानंतर आपल्याला हे तांदूळ धुऊन पाणी फेकून द्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी टाकायचे आहे यानंतर आपल्याला दोन ते तीन तास तसेच तांदूळ त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहे.

तांदळाचे पाणी हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे आपल्याला माहीत आहे पण याचा वापर कसा करावा हे आपल्याला समजत नाही. यामध्ये असणारे घटक द्रव्यामुळे आपल्या केसांना मजबुती प्राप्त होत असते त्याचबरोबर तांदुळाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अमिनो एसिड असते जे आपल्या केसांचे मूळ घट्ट बनवण्यासाठी मदत करत असते.

त्यानंतर तांदूळ व्यवस्थित भिजून झाल्यानंतर आपल्याला हे पाणी गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे लिंबू. आपल्याला हा उपाय करण्यासाठी लिंबूचा रस सुद्धा लागणार आहे. लिंबू मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी उपलब्ध असतात आणि हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. लिंबूमुळे आपले केसांचे आरोग्य चांगले राहते त्याचबरोबर केस चमकण्यासाठी व केस पांढरे झालेले असतील तर ते काळे करण्यासाठी लिंबू महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करण्यासाठी लिंबू वापरायचा आहे त्यानंतर शाम्पू मध्ये हे दोन्ही पदार्थ मिक्स करून आपल्या केसांच्या मुळाशी लावायचे आहे आणि हे बनवलेले मिश्रण तुमच्या केसांना लावायचे आहे आणि हे मिश्रण लावल्यानंतर काही काळ तसेच केसांना राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवायचे आहे. ते पाणी कोमट पाहिजे याचे उदाहरण तुम्हांला खाली देणार आहे.

कोंबडी कापल्यानंतर ती गरम पाण्यात डीप केली जाते आणि यामुळे कोंबडीच्या अंगावरील केस झटपट नि घून जातात. म्हणून केसांवर कधीही गरम पाणी जास्त टाकू नये. यामुळे टक्कल देखील पडण्याची शक्यता असते. हे उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस जरी केले तर एका महिन्यातच शंभर टक्के याचा रिजल्ट मिळणार आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!