Home / आरोग्य / फक्त 5 मिनिटांत घरातील मच्छर, माश्या,छुमंतर होतील पुन्हा घरात दिसणारच नाहीत. सर्व कीटकांपासून सुटका.

फक्त 5 मिनिटांत घरातील मच्छर, माश्या,छुमंतर होतील पुन्हा घरात दिसणारच नाहीत. सर्व कीटकांपासून सुटका.

नमस्कार,

आज आम्ही आपल्याला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यांद्वारे आपल्याला आपल्या घरातील उंदीर, झुरळे, पालींपासून सुटका मिळेल.

या पृथ्वीवर जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे माश्या ह्या आहेतच.खरंतर माश्यांचं आयुष्य जेमतेम वीस पंचवीस दिवसांचं असतं पण तरी त्यांचा एवढा त्रास का होतो? कारण त्यांनी अंडी घातल्यापासून त्यातून नवीन माश्या बाहेर यायला लागणार वेळ हा फक्त वीस तास आहे आणि इतकंच नाही तर फक्त तीनच आठवड्यात अंड्यातून आलेल्या माशीची पूर्ण वाढ होऊन ती नवीन अंडी घालायला सज्ज होते!

या माश्या फक्त त्रासदायकच नसतात तर धोकादायक सुद्धा असतात.माश्यांच्या पायांवर, पंखांवर अनेक प्रकारचे बॅक्टेरीया असतात आणि याच माश्या आपल्या नकळत आपल्या अन्नावर किंवा हातावर बसतात तेव्हा त्यांच्या पायांवरचे आणि पंखांवरचे जीवाणू आपल्या हातावर किंवा अन्नावर येतात आणि मग त्याच हाताने आपण खाल्लं कि रोगराई पसरते

अशी मिळवा घरातील उंदरांपासून सुटका. जर आपल्या घरात उंदीर झाले असतील तर पेपरमिंटचे काही तुकडे घरातील आणि स्वयंपाकघरातील सर्व कोपऱ्यांमध्ये ठेवून द्या. उंदरांना पेपरमिंटचा वास अजिबात आवडत नाही आणि त्यापासून ते दूर पळतात. यामुळे आपल्याला त्यांच्यापासून सुटका मिळते. जर तरीही ते येत असतील तर आठवड्यातून 3-4 दिवस सतत हा उपाय करा. उंदीर आपल्या घरातून निघून जातील.

माशांना पळवून लावण्यासाठी करा हे उपाय:- काही झाडे, त्यांच्या फुलांचा वास माश्यांना आवडत नाही त्यामुळे ही झाडं आपल्या बागेत किंवा बाल्कनीत किंवा अगदी खिडकीत जरी लावली तरी माश्या घरात येणार नाहीत.

माशांपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे घराचे दरवाजे शक्य तेव्हा बंद ठेवणे आणि घरात स्वच्छता राखणे. याशिवाय कुठल्याही उग्र वासाच्या तेलात कापड किंवा कापूस बुडवून ते दरवाजाजवळ ठेवा. कारण उंदरांप्रमाणेच माशांनाही उग्र वासाचा त्रास होतो. यामुळे त्या आपल्या घरातून निघून जातील.

अशी मिळवा पालींपासून सुटका घरातील पालींपासून सुटका मिळवण्यासाठी घरातील भिंतींवर चारपाच मोरपिसे चिकटवा. मोर हे पालींना खाऊन टाकतात, त्यामुळे त्यांची पिसे पाहून पाली घाबरतात आणि पळून जातात. या सोप्या आणि साध्या उपायांनी आपण आपल्या घरातील हे किटक घालवून देऊ शकता.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!