Home / आरोग्य / चेहरा होईल मुऊ आणि कोमल अगदी तान्ह्या बाळासारखा, फक्त हे करा. चेहर्‍यावरचे काळॆ डाग एका दिवसात गायब. सोपा घरगुती उपाय..

चेहरा होईल मुऊ आणि कोमल अगदी तान्ह्या बाळासारखा, फक्त हे करा. चेहर्‍यावरचे काळॆ डाग एका दिवसात गायब. सोपा घरगुती उपाय..

नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

बऱ्याच जणांचा चेहरा कोरडा पडणे राखड दिसणे किंवा चेहऱ्यावर वांग येणे, काळे डाग येणे, सुरकुत्या पडणे आणि महत्त्वाचे म्हणजे अगदी कमी वयात भरपूर वय झाल्यासारखे दिसते आणि चेहऱ्यावर निस्तेजपणा येणे. या समस्या असतात तर अशावेळी जर तुम्ही हा घरगुती उपाय केला तर, काहीही खर्च न करता महागड्या क्रीम उपाय न करता घरच्या घरी अगदी नैसर्गिक रित्या तुम्ही तुमचा चेहरा गोरा गोरा पान सुंदर आणि कोमल अगदी लहान मुलांसारखा बनवू शकता.

चला तर मग पाहूया हा बहुगुणी उपाय कसा बनवायचा ते. तर अशा या बहुगुणी उपाय यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे मध. एक चमचा या ठिकाणी घ्यायचा आहे. यासोबतच दुसरा घटक आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कोरफड सध्या घरोघरी कोरफडीचे झाड लावलेले असते. जर नसेल तर तुम्ही रेडिमेट कोरफड जेल देखील घेऊ शकता.

असेही कोरफड जेल आपल्याला एक चमचा या ठिकाणी घ्यायची आहे. यानंतर आपल्याला लागणारा पदार्थ म्हणजे खोबरेल तेल. एक चमचा मध, एक चमचा कोरफड जेल आणि अर्धा चमचा खोबरेल तेल घ्यायचे आहे. आता हे मिश्रण आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे.

हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्याला आपला चेहरा थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. चेहरा धुतल्यानंतर तो चांगल्याप्रकारे कॉटनच्या कपड्याने कोरडा करून देखील घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता तुम्ही कापसाच्या साहाय्याने किंवा शक्यतो हाताच्या साहाय्याने आपल्या हे मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता.

तर हे मिश्रण ज्या ठिकाणी चेहऱ्यावर वांग काळे डाग आहे, सुरकुत्या आलेले आहेत त्या ठिकाणी किंवा पूर्ण चेहऱ्यावर देखील तुम्ही लावू शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाच उपाय तुम्ही हात, पाय, मान यावर देखील करू शकता. अशा प्रकारे हे मिश्रण लावून गोलाकार आकारात साधारणपणे एक वेळेस आपल्याला दहा ते पंधरा मिनिट मसाज करायची आहे.

मसाज केल्यामुळे त्या भागावरील रक्त प्रवाह सुरळीत होतो शिवाय त्या भागावरील आलेल्या सुरकुत्या असतील डाग असतील ते नाहीसे होऊन काळपटपणा देखील दूर होऊन त्वचा टाइट आणि सुंदर दिसण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे हा उपाय सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेस आपल्याला करायचा आहे.

फक्त बाहेरून आल्यानंतर लगेच हा उपाय करायचा नाही आणि उपाय केल्यानंतर लगेच बाहेर जायचे नाही साधारणपणे यामध्ये एक तासाचे अंतर असावे. अशा प्रकारे दिवसभरात साधारणपणे सकाळ-संध्याकाळ दोन वेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे. उपाय केल्यानंतर वीस मिनिटे आपल्याला असे सोडायचे आहे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन रुमालाने पुसून घ्यायचा आहे आणि चेहरा धूत असताना कोणत्याही प्रकारची क्रीम साबण किंवा फेशवास आपल्याला वापरायचा नाही.तर उपाय केल्यानंतर एक तासांनी तुम्ही अशाप्रकारे काहीही खर्च न करता अगदी घरच्या घरी आपल्या चेहऱ्याची गेलेली चमक परत आणा आणि चेहऱ्यावरील वांग काळे डाग देखील दूर करा.

असेच माहितीपूर्ण जीवनशैली लेख रोज मिळवण्यासाठी आमचे Marathi Updates फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!