Home / आरोग्य / “अंथरूनास खीळलेला माणसाला तंदुरस्त करणारी चमत्कारी अशी वनस्पती, आजारातून बरे झालेले आवश्य करा वापर..!!

“अंथरूनास खीळलेला माणसाला तंदुरस्त करणारी चमत्कारी अशी वनस्पती, आजारातून बरे झालेले आवश्य करा वापर..!!

सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आपल्या जीवाची काळजी घेत आहे परंतु अनेकदा आपल्याला सर्दी खोकला ताप यासारख्या समस्या उद्भवत असतात त्याचबरोबर अकाली केस पांढरे होणे ,अपचनाची समस्या, चेहऱ्यावर काळे डाग येणे, अंगावर खाज येणे यासारखे असंख्य समस्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होत असतात.

त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक जण कोरोनाचे शिकार होत आहे अशा वेळीसुद्धा आजार झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये प्रचंड थकवा जाणवत असतो आणि हा थकवा दूर करण्यासाठी आपण अनेक उपचार सुद्धा करत असतो परंतु त्यांचा फारसा आपल्या शरीरावर फरक पडत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या माहितीचा उपयोग जर आपण केला तर काही दिवसातच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती तर वाढणार आहे त्याचबरोबर अशक्तपणा निर्माण झालेला आहे तो सुद्धा दूर होणार आहे.. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल…

हा उपाय करण्यासाठी आपल्याला गव्हांकुर चा उपयोग करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचा आणि बेसिक प्रश्न म्हणजे गव्हांकुर म्हणजे काय? गव्हांकुर म्हणजे गव्हाला आलेले अंकुर. अनेक जण त्याला ‘हिरवे रक्त’ असे देखील म्हणतात. गव्हाचे दाणे पेरल्यावर त्याचे गवत उगवते त्यास गव्हांकुर म्हंटले जाते.

या उपायांचा आधुनिक शास्त्रांमध्ये अमृत समान मानले गेलेले आहे. परदेशातही अनेक औषधांमध्ये त्याचा समावेश केला जातो. गव्हांकुरामध्ये व्हिटॅमिन,क्षार आणि प्रोटीन यांची भरपूर मात्रा असते. हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील असंख्य आजार दूर होतात म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी गव्हांकुर म्हणजेच गव्हाचे गवत असते याचा उपयोग करायचा आहे.

गव्हांकुर मध्ये क्लोरोफिल नावाचे घटक उपलब्ध असते आणि हे घटक आपल्या शरीरातील रक्त स्वच्छ करण्याचे कार्य करत असते. गव्हांकुर मध्ये विटामीन ए, विटामीन बी, विटामीन सी त्याचबरोबर सोडियम, पोटॅशियम ,कॅल्शियम ,मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह यासारखे घटक खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात आणि त्याचबरोबर यामध्ये विटामिन ए भरपूर असल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुध्दा यामुळे चांगले होते. डोळ्यांसाठी पण याचा उपयोग खूप होतो.

गव्हांकुर तुम्ही चावून चावून सुद्धा खाऊ शकता, आपल्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असल्यास आपल्या शरीरामध्ये पोषक तत्व निर्माण करण्याचे कार्य करते. जर तुम्हाला पायरिया झाला असेल, दाताच्या समस्या असतील अशा वेळीसुद्धा गव्हांकुर चावून-चावून खाल्ल्यामुळे तुमच्या दाताच्या समस्या सध्या पूर्णपणे दूर होऊन जातात

कॅन्सर पेशेंटसाठी त्याचा रस असायला हवा. गव्हांकुर मध्ये कॅन्सर ज्या काही पेशी असतात त्या पेशींवर मात करण्याची क्षमता असते आणि यामुळे कॅन्सर सारखा आजार आपल्याला होत नाही. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचारोग झाला असेल तर अशावेळी दिवसभरातून एक आपल्याला गव्हांकुराचा रस प्यायचा आहे.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये तसेच वैज्ञानिक शास्त्रांमध्ये हे सिद्ध झाले आहे की या गव्हांकुराचा मध्ये आपल्या शरीरात जे काही विषारी घटक असतात ते स्वच्छ करण्याची क्षमता असते म्हणून जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग झाला असेल तर गव्हांकुराचे सेवन अवश्य करा. याचा रस आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. हे गव्हांकुर आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो. गव्हांकुराचे रस घेणे सुरु करा आणि फक्त तीन आठवड्यात आपल्या कमजोर झालेल्या शरीरात पुन्हा स्फूर्ती, टवटवीतपण आणि ताजेपण घेऊन या.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!