Home / आरोग्य / “पावसाळ्यात पायातील चिखल्या होणारच नाहीत,हा घरगुती उपाय करा आणि अशी काळजी घ्या..

“पावसाळ्यात पायातील चिखल्या होणारच नाहीत,हा घरगुती उपाय करा आणि अशी काळजी घ्या..

सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू झालेला आहे. पाण्याच्या सततच्या संसर्गामुळे किंवा पाण्यात सतत काम करत राहिल्याने पायाच्या बोटांच्या बेचक्यात चिखल्या होतात. त्या टाळण्यासाठी काही घरगुती उपायही लाभदायक ठरू शकतात..
पाण्याच्या सततच्या संसर्गामुळे किंवा पाण्यात सतत काम करत राहिल्याने पायाच्या बोटांच्या बेचक्यात चिखल्या होतात. त्या टाळण्यासाठी काही घरगुती उपायही लाभदायक ठरू शकतात..

पावसाळा म्हटला तर प्रत्येकाचा आवडता ऋतू आहे परंतु पावसाळा येतात आरोग्याच्या अनेक समस्या सुद्धा आपल्या मागोमाग येत असतात त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये इन्फेक्शन, सर्दी, खोकला अशा अनेक समस्या उद्भवत असतात आणि अशा वेळी काळजी घेणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे म्हणूनच आम्ही तुमच्या साठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण दमट होणे यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. अनेक वेळा आपली त्वचा फाटू लागते. त्वचेला जखम झाली तर ती जखम लवकर भरून निघत नाही अशा वेळी या हंगामामध्ये आपली त्वचा जपणे अतिशय गरजेचे ठरते.

पायाला चिखली झाले की अनेक वेदना होऊ लागतात, आग होऊ लागते, पायांना खाज सुटू लागते , पायांच्या बोटांमध्ये पू येऊ लागतो. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज घरच्या घरी करता येणारा असा रामबाण उपाय तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. शेतात काम करतात त्यांनी याची काळजीपूर्वक काळजी घेतली पाहिजे.

आपण भिजल्यामुळे अनेकदा त्वचेच्या समस्या निर्माण होऊ लागतात म्हणूनच आज एक घरगुती उपाय सांगणार आहोत. तो उपाय अतिशय सोपा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला हवा तो पदार्थ वापरायचा आहे तो पदार्थ आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातो ,त्या पदार्थाचे नाव आहे हळद . आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये हळद ही अँटी बॅक्टेरियल म्हणून वापरण्यात आलेले आहेत. हळदीमध्ये आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरावर एखादी जखम झाली असेल तर ती जखम भरून काढण्यासाठी मदत करत असते.

त्यानंतर आपल्याला जो पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे मोहरीचे तेल. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये मोहरीचे तेल अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. मोहरीच्या तेलामध्ये असे काही सिग्न पदार्थ असतात. जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असतात त्यामुळे आपली त्वचा अत्यंत मऊ कोमल मुलायम राहते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी हळद आणि थोडेसे तेल घ्यायचे आहे. जेणेकरून एक व्यवस्थित पेस्ट तयार होईल आणि ही पेस्ट जखम झालेल्या भागावर लावायची आहे. हा उपाय करण्यापूर्वी आपल्या पाय स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही पेस्ट आपण जी बनवलेली आहे ती पेस्ट आपल्याला प्रभावित जागेवर लावायचे आहे. रात्री झोपताना करायचा आहे, अशा पद्धतीने जर आपण आठवडाभर हा उपाय केला तर आपल्या पायाला झालेल्या चिखल्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.

हा झाला पाया संदर्भात उपाय परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या पायांची विशेष काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे म्हणूनच जास्त काळ आपले पाय पाण्यात राहणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर शूज, चप्पल , बूट वापरताना सुद्धा विशेष ध्यान देणे गरजेचे आहे जेणेकरून पायांना कोणत्याही प्रकारचे त्वचा संबंधित इन्फेक्शन होणार नाही हे पाहणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!