Home / Motivation / पतीने लग्नानंतर पंधरा दिवसाच्या आत दिले तिला सोडून, तिच्यावर केला होता अन्याय त्यानंतर झाले असे काही की..

पतीने लग्नानंतर पंधरा दिवसाच्या आत दिले तिला सोडून, तिच्यावर केला होता अन्याय त्यानंतर झाले असे काही की..

असे म्हणतात की वय आपल्याला खपत नाही लागलेली ठोकर पाडत नाही जर तुमच्याकडे जिंकण्याची इच्छा असेल तर परिस्थिती सुद्धा तुम्ही हरवु शकता आणि आपले ध्येय प्राप्त करु शकता. आपल्या समाजामध्ये खरे तर महिलांना लग्नानंतर आपल्या पतीवर अवलंबून राहावे लागते. अशा मध्ये जर एखाद्या चे लग्न अयशस्वी झाले तर त्या मुलीला समाजाचा कडून खूपच ऐकावे लागते. या सगळ्या गोष्टींचा पार जाऊन जर एखादी महिला समाजाच्या टोमणे ला लढा देऊन आपल्या पायावर उभे राहून आपले भाग्य जर बदलवत असेल तर अशावेळी तिचा मार्ग खडतर असतो, तिच्या मार्गामध्ये अनेक संकटे येत असतात परंतु जर त्या महिलेने जिद्दीने त्यांनी ठरवले तर तिचा मार्ग कोणीच रोखू शकत नाही. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेने बद्दल सांगणार आहोत.तिच्या पतीने लग्नानंतर फक्त पंधरा दिवसाचा मध्येच या महिलेला सोडून दिले. परंतु या महिलेने हार मानली नाही. आणि एक आय आर एस अधिकारी बनून सगळ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनली.

कोमल यांची ओळख –
कोमाल गनात्रा आपल्या आई-वडिलांसोबत गुजरात मध्ये राहतात. त्यांचे वडील एक शिक्षक आणि आई गृहिणी आहे.कोमल सुरुवातीपासून अभ्यासामध्ये अत्यंत हुशार होती.कोमल यांनी सांगितले की त्यांचे वडील नेहमी जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी तिला प्रोत्साहन करत असे. वडिलांच्या पेरणीमुळे तिला आत्मबळ प्राप्त होत असे आणि तिच्या वडिलांची अशी इच्छा होती की कोमल एक आय ए एस अधिकारी बनायला हवी.

लग्नाच्या 15 दिवसानंतरच पतीने सोडले –
कोमल यांचा विवाह वयाच्या 26 व्या वर्षी न्युझीलँड च्या एन आर आय शैलेश सोबत झाला. तेव्हा कोमल यूपीएससीची तयारी सोबतच पीसीएससी तयारी सुद्धा करत होती. त्याकाळी कोमल गुजरात पब्लिक सिविल सेवा मेन्स मध्ये सुद्धा यश प्राप्त केले होते परंतु शैलेशने सांगितले की आपण न्यू झीलंड ला जाणार आणि कोमल ला मुलाखतीसाठी जाण्यास मनाई केली. लग्नाच्या पंधरा दिवसानंतर कोमलचे पती परत रवाना झाले त्यानंतर कधी परतले नाही. कोमल यांनी आपल्या पतीसोबत चर्चा करण्याचे ठरवले परंतु प्रत्येक प्रयत्न हा अयशस्वी ठरला.

धोक्याने जीवनाचे लक्ष्य बदलून दिले –
कोमलने आपल्या समस्येचे निवारण न सापडत असल्यामुळे पुन्हा माहेरी जाण्याचे ठरवले. परंतु तिचे जीवन संघर्षमय होते. आर्थिक स्वरूपामध्ये अवलंबून असल्याने तिच्यातील आत्मसन्मानाची भावना दिवसेंदिवस कमी होत चालली होती आणि हीच भावना तिला मनामध्ये खूपच होती. काहीतरी करण्याची जिद्द पुढे आणत होते यासोबतच शेजारी व नातेवाईक यांच्याकडून तिला नेहमी टोमणे ऐकायला मिळत असते आणि या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये तिला तिच्या वडिलांच्या अनेक आठवणी आठवू लागल्या होत्या आणि तिने यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

महिलीची ओळख ही पति च्या नावाने नाही तर स्वतःच्या आत्मसन्मानाने तयार होत असते.

कोमल सांगतात की घडलेल्या सर्व घटनेतून त्यांनी बोध घेतला आणि ठरवले की एका महिलेची ओळख ही तिच्या पतीच्या नावाने नाही तर तिच्या आत्मसन्मान व स्वतःच्या कष्टामुळे प्राप्त होत असते. लग्न माणसाला संपूर्ण बनवत नाही तर माणसाचे कष्ट करण्याची जिद्द त्याच्या आयुष्याला स्वयंपूर्ण बनवत असते आणि या स्वयंपूर्ण यातूनच आपल्याला स्वतःचा प्रवास पूर्ण करायचा असतो.

ध्येय प्राप्त करण्यासाठी घरापासून 40 किलोमीटर राहिल्या दूर –
कोमल यांना एक गोष्ट जाणवते की, यूपीएससीची तयारी करण्यासाठी व एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी त्यांना घरापासून दूर जाणे आवश्यक होते. म्हणूनच कोमल आपल्या आई-वडिलांपासून पंधरा पासून 40 किलोमीटर दूर असणाऱ्या एका गावामध्ये राहू लागल्या. कोमल त्या गावामध्ये एका प्राथमिक शिक्षकाच्या रूपामध्ये कार्यरत राहिल्या. कोमल सांगतात की ते गाव एवढे मागासलेले होते की त्या गावांमध्ये कोणतेही इंग्रजी वर्तमानपत्र येत होते ना कोणते नियतकालिके.. त्यावेळी त्यांच्याकडे इंटरनेटची कोणती सुविधा सुद्धा उपलब्ध होती नव्हती म्हणूनच प्रत्येक रविवारी गावापासून दीडशे किलोमीटर प्रवास करून आमदाबाद ऑप्शनल सब्जेक्ट कोचीग करण्यासाठी जात असे.

शेवटी चौथा प्रयत्नांमध्ये प्राप्त केले सफल यश –

यु पी एस सी परीक्षा मध्ये यशस्वी होणे हे काही एवढे सोपे नाही. त्यांनी युपीएससी परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केले परंतु असे म्हणतात की मेहनत कधीच वाया जात नाही. शेवटी कोमल यांची मेहनत फळास आली आणि चौथ्या प्रयत्नांमध्ये त्यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. आणि वर्ष 2012 मध्ये युपीएससीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. कोमल सांगता की यूपीएससीच्या परीक्षेच्या दरम्यान त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही. त्या मुलाखती देण्यासाठी पहिल्यांदा दिल्ली येथे गेल्या होत्या तेव्हा शनिवारी पूर्णपणे काम करून मुलांना शिकवूण गुजरात वरून दिल्ली ला जाण्यासाठी रवाना झाल्या आणि सोमवारी त्यांनी आपली मुलाखत दिली.

लग्न तूटल्या नंतर अनेकदा महिला आपले धैर्य गमावून बसतात त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन जाते.परंतु त्यांनी दाखविलेली हिंमत आणि धैर्य यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळणार आहे त्यांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी एक प्रेरणा स्त्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाणार आहे. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कमेंट आणि जास्त शेयर करा. आणि आमचा पेजला लाईक करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!