Home / आरोग्य / खास माता भगिनींसाठी ,केस गळणार नाहीत,टक्कल पडणे थांबेल मऊ आणि मुलायम केसांसाठी हा उपाय करा

खास माता भगिनींसाठी ,केस गळणार नाहीत,टक्कल पडणे थांबेल मऊ आणि मुलायम केसांसाठी हा उपाय करा

केस गळती थांबून केस मजबूत आणि मुलायम बनवण्यासाठी करा हा घरगुती उपाय. नमस्कार मित्रांनो तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील अनेक महागडी तेल वापरून देखील टक्कल वाढत चालली असेल.

तर फक्त पंधरा दिवस या जेलने दररोज रात्री न चुकता केसांची आणि केसांच्या मुळापासून मालिश करा. याशिवाय ज्या माता भगिनींचे केस कमजोर आहेत किंवा केसांचा रुक्षपणा वाढून ते सतत तुटत असतील तर आजचा हा सोपा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करा तुमचे केस पूर्वीपेक्षा जास्त लांब काळे आणि मजबूत होतील.चला तर पाहुयात हा उपाय कसा बनवायचा.

आजचा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक भांडे घेऊन त्यामध्ये एक ग्लास एवढे पाणी घ्यायचे आहे. आता आपल्याला आवश्यक आहे पळशी म्हणजेच जवस किंवा फ्लॅक्ससीड म्हणून देखील ओळखली जाते. आपण दोन चमचे पळशी या मध्ये टाकायचे आहे. आणि हे पाणी उकळून घ्यायचे आहे.

मित्रांनो आपल्या केसांच्या वाढीसाठी पळशी फार उपयुक्त असते अगदी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात उपलब्ध होते. हेअर फॉलिकल उत्तेजित करून केस उगवण्यासाठी पळशी मधील घटक मदत करतात. पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्या नंतर ते एका स्वच्छ कापडाचे मदतीने गाळून घ्यायचे आहे जेणेकरून ते आपल्या केसांना आणि केसांच्या मुळाशी सहजपणे अप्लाय करता येईल. या पाण्याला उकळून घेतल्यामुळे या पाण्याचे घट्ट जेलमध्ये रूपांतर होते यानंतर आपल्याला आवश्यक आहे.

व्यासलीन प्रिय मित्रांनो रखरखीत त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी हे व्यासलीन वापरले जाते. एका ठराविक प्रमाणात याचा आपल्या केसांसाठी वापर केला तर आपले केस सुंदर मुलायम आणि चमकदार बनतात. आपण अगदी थोडेसे व्यासलीन या पळशीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. मित्रांनो हे जेल गरम असतानाच व्यासलीन यामध्ये टाकल्याने ते व्यवस्थितपणे विरघळते हे व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपला उपाय तयार झाला.

एखाद्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवलेतर याचा आपल्याला आपल्या गरजेनुसार वापर करता येईल. याचा रात्री झोपण्यापूर्वी केसांची आणि केसांच्या मुळापासून हलक्या हाताने मालिश करायचे आहे. आणि रात्रभर तसेच ठेवून सकाळी ते स्वच्छ धुवायचे आहेत 15 ते 21 दिवस हा उपाय केल्याने केसांची लांबी वाढते केस गळणे थांबवून केस मजबूत आणि मुलायम बनतात याशिवाय नवीन सुरुवात होते माहिती आवडल्यास शेअर करा धन्यवाद

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!