Home / आरोग्य / कोणत्याही काढ्या पेक्षा ७ पट प्रभावी काढा, प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल. २५ आजार बरे संसर्गाची भीतीच नाही.

कोणत्याही काढ्या पेक्षा ७ पट प्रभावी काढा, प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल. २५ आजार बरे संसर्गाची भीतीच नाही.

मंडळी सध्या संसर्गाची लाट सुरू आहे. आणि या संसर्गापासून बचाव होण्यासाठी आपण वेगवेगळे घरगुती उपाय करतच असतो. मंडळी यामध्ये वेगवेगळे काढे करणे असेल वेगवेगळे प्रकारची वाफ घेणे असेल. असे वेगवेगळे घरगुती उपाय आपण करत असतो. जेणेकरून आपल्याला दवाखान्यात जायची गरज नाही. आणि संसर्ग आपल्याला होणार नाही यासाठी आपण हे उपाय करत असतो.

आज मी असाच एक उपाय घेवून आलो आहे तुमच्या साठी ज्या उपायाने तुमची प्रतिकारशक्ती इतकी वाढेल की तुम्हाला कोणत्याही विषाणूचा संसर्ग होणार नाही. आणि पावसाळयात व्हायरल इन्फेक्शन सुधा होणार नाही.

साधारण जो कोरडा खोकला असेल, कणकण असेल, बारीक ताप असेल, थकवा, चकर येणे, भूक न लागणे, पोटाच्या समस्या असेल. या सर्व समस्यांना तुम्ही या उपायाने बाय बाय करणार आहात. हा घरगुती उपाय इतका प्रभावी आहे आणि सर्वात महत्त्वाचं हा घरगुती उपाय काय नवीन नाही आहे. आपली आजी आजोबा जुन्या काळात हा उपाय करत असत.

आपल्याला घरतीलच काही पदार्थ यासाठी लागणार आहेत. आणि तुमच्या परिसरातील एक दोन पदार्थ लागणार आहेत. ते पदार्थ कोणते आहेत. हा उपाय कधी करायचा आणि कुणी करायचा नाही या बदल सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामध्ये पहिला मिळणार तरी एक विनंती हा लेख पूर्ण वाचा.

तर मंडळी यासाठी आपण काय करणार आहोत. सर्व प्रथम एक ग्लास पाणी घ्या. आणि उकळायला ठेवायचे आहे गॅस वर उकळायला ठेवल्यानंतर त्यात आपल्याला एक तुकडा गुळवेलचा टाकायचा आहे. गुळवेल आयुर्वेदातील सोन आहे. आणि म्हणून गुळवेल चा तुकडा आपल्याला येते टाकायचा आहे. आपण ह्या एक ग्लास पाण्यात दोन व्यक्तींना काढा बनवणार आहे.

ज्यांना थोडासा ताप असेल कणकण असेल त्यांनी गुळवेलचे एक पान सुधा टाकायचे आहे. ज्यांना ताप नसेल त्यांनी नाही टाकले तरी चालेल. नंतर आपल्याला टाकायचे आहे आले, सुंठ एक छोटासा तुकडा आपल्याला टाकायचा आहे जास्त नाही.

त्यानंतर एक चमचा बडीसेफ टाकायची आहे. त्यानंतर गुळाचा एक छोटासा तुकडा यामध्ये टाकायचा आहे. बघा या चार ते पाच गोष्टी आपण या पाण्यामध्ये टाकल्या आहेत. हे सर्व झाल्या नंतर हे मिश्रण भरपूर उकळायचे आहे इतके उकळायचे आहे की एक ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास पाणी झाले पाहिजे. अश्या पद्धतीने आपल्याला काढा बनवायचा आहे.

हा काढा झाल्यानंतर हा काढा व्यवस्थित गाळून घ्या. हा काढा दिवस भरामध्ये कधीही घेवू शकता. पण हा काढा घेण्यासाठी उत्तम वेळ ही सकाळी उपाशी पोटी आहे. आणि म्हणून या वेळेस आपण हा काढा घेतला तर त्याचा प्रभाव थोडासा जास्त राहील.
बघा मंडळी हा घरगुती उपाय केल्याने तुमचा ताप असेल, खोकला असेल, कणकण असेल, थकवा, चकार येणे असेल, पोटाच्या काही समस्या असतील. या सारखे सर्व आजार निघून जाणार आहेत. आणि हे आजार तुम्हाला झाले नसतील तर भविष्यात तुम्हाला होणार नाहीत. त्याच प्रमाणे तुमची प्रतिकार शक्ती भरपूर प्रमाणात वाढेल. जेणेकरून तुम्हाला कोणताही संसर्ग होणार नाही. तर मंडळी हा उपाय तुम्ही घरी नक्की करा व या आजारापासून दूर राहा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!