Home / आरोग्य / सगळे जण काळजी घेत आहेत परंतु संसर्गाविना जगायचे असेल तर हा १ पदार्थ चुकूनही खाऊच नका.

सगळे जण काळजी घेत आहेत परंतु संसर्गाविना जगायचे असेल तर हा १ पदार्थ चुकूनही खाऊच नका.

सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या परिस्थितीमध्ये आपण सगळे जण आपल्या शरीराचे विशेष काळजी घेत आहे परंतु प्रत्येक जण ही काळजी घेत असताना आपल्या आहाराबाबत काळजी घेत आहे का..? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वतःला हा प्रश्न विचारला का? सध्याच्या काळामध्ये आपण जे काही पदार्थ खात आहोत त्याचा आपल्या शरीराला नेमका काय फायदा होतो आहे याबद्दल सुद्धा विचार करणं तेवढेच गरजेचे आहे.

कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कशी चांगली राहील याचासुद्धा विचार करायला पाहिजे म्हणूनच दैनंदिन जीवनामध्ये आहार करताना असे काही पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करायला हवे जेणेकरून आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती व शरीरातील इतर अवयव सुद्धा चांगली व मजबूत राहतील म्हणूनच आजच्या लेखामध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

दैनंदिन जीवनामध्ये साखर युक्त पदार्थ आपण नेहमी खाणे टाळले पाहिजे. यामुळे काय होते की आपल्या शरीरामध्ये इम्पलीमिशन ची प्रक्रिया मंदावते आणि आपल्या शरीरावर कोणत्याही विषाणूचा अटॅक लवकर होण्याची शक्यता असते. यामध्ये शीतपेय ,कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक या सर्वांचा समावेश होतो. हे पदार्थ प्रामुख्याने खायला नाही पाहिजे कारण की यामुळे याच्यातील घटकांमुळे शरीरामध्ये अनेकदा रासायनिक बदल घडवून ऍसिडिटी सुद्धा होण्याची शक्यता असते. आपण ते लहान मुलांना देत असतो.

त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये फ्रोजन फुड सुद्धा जास्त प्रमाणात गेले नाही पाहीजे कारण की या प्रकारच्या फ्रोजन फुड मध्ये जास्त प्रमाणात मीठ असल्याने ते आपल्या शरीरासाठी चांगले नसते. डब्ल्यूएचओ च्या निर्देशानुसार आपल्या शरीरामध्ये 5 Mg पेक्षा जास्त मीठ जाणं गरजेचं चांगले नाही. मीठ कमी प्रमाणात घेतले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणून जे काही रासायनिक प्रक्रिया केलेले व साठवणूक केलेले पदार्थ आहेत ते आपण शक्यतो खाणे टाळले पाहिजे. यासारख्या फ्रोजन फुड मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी होण्यास मदत होते म्हणूनच हे पदार्थ खाताना विचार करूनच खाल्ले पाहिजे.

त्यानंतर तिसरे पदार्थ आहे ते पॅकिंग केलेले पदार्थ. हे पदार्थ प्रामुख्याने पॅकिंग केलेले असतात ते पदार्थ सुद्धा जास्त प्रमाणात खायला नाही पाहिजे. कारण की यामुळे आपली इमपलिमेशन प्रक्रिया मंदावते आणि त्याचबरोबर यामध्ये सोडियमचे प्रमाण सुद्धा जास्त असते.

त्यानंतर चौथे पदार्थ म्हणजे मसालेदार पदार्थ. अनेकदा आपण बाहेर गेल्यावर मसालेदार पदार्थ खात असतो चमचमीत पदार्थ खात असतो यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. वारंवार मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये बहुतेकदा ऊष्णता निर्माण होते आणि आपल्याला कशा संदर्भात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात अनेकदा तोंड येणे यासाठी समस्यासुद्धा होत असते म्हणून जास्त प्रमाणात मसालेदार पदार्थ खाऊ नये यामुळे आपल्या घशाला इन्फेक्शन होते. घरगुती मसाले कधी हि उत्तम.

त्यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे तेलकट पदार्थ. सध्याच्या दिवसांमध्ये आपण प्रत्येक जण घरी राहून काम करत आहे आणि त्यामुळे तेला पासून बनवलेले अनेक वस्तू आपण दैनंदिन जीवनामध्ये खात आहोत आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅटचे प्रमाण अत्यंत वाढत आहे आणि कोलेस्टरॉल सुद्धा बहुतेक वेळा वाढत आहे यामुळे हृदया संदर्भातील समस्या सुद्धा उद्भवण्याची शक्यता आहे म्हणून तेलकट-तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये.

जर आपण दैनंदिन जीवनामध्ये या लेखात सांगितलेल्या काही माहितीचा नेहमी उपयोग केला तर तुमचे जीवन आरोग्य सुदृढ राहील आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची समस्या उद्भवणार नाही म्हणून सध्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्‍ती चांगली ठेवण्यासाठी ही काही पदार्थ आपल्याला टाळणे गरजेचे आहे.

नोट :- जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!