Home / आरोग्य / या उपायमुळे कुठलेही कीटक असो ते घरातून सहज रित्या बाहेर निघून जाते.

या उपायमुळे कुठलेही कीटक असो ते घरातून सहज रित्या बाहेर निघून जाते.

आज आम्ही आपल्या साठी घरात जर पाल झाली असतील झुरळ, डास, माश्या झाल्या असतील तर या पासून अगदी घरच्या घरी सहज रित्या लगेच सुटका करून देणारा बहुगुणी उपाय आणि लगेच करता येणारा असा उपाय घेवून आलो आहोत. जर घरत असे कीटक झाले तर आपण याच्या पासून वाचण्यासाठी बरच काही करत असतो व वेगवेगळे औषध या साठी आपण वापरत असतो. परंतु याचा परिणाम आपल्यावर ही होतो. लहान मुलांवर देखील याचा परिणाम होतो. आणि महागडे प्रॉडक्ट आणून पैसे देखील खर्च होतात.

तर मित्रांनो अगदी साधा सोफा उपाय तुम्ही घरच्या घरी जर केल्यात तर या सर्व किटका पासून सहजपणे सुटका होणार आहे. तर चला बघुया काय आहे हा उपाय..

एका पातेल्यात अर्धा कप भरून पाणी घ्या. नंतर काळीमिरी घ्या. कलिमिरीचा वास कोणत्याही कीटकांना सहन होत नाही. म्हणूनच येते आपण काळीमिरी घेतली आहे. काळीमिरी ची प्रथम पावडर करून घ्या. आणि त्या पाण्यामध्ये एक चमचा पावडर टाका. नंतर पुढे कडुलिंबाची पाने घ्या. आपल्याला हे माहितीच आहे की कडुलिंब किटाणू पासून सुरक्षा करण्यासाठी किती महत्वाचे आहे. याच्या उग्र आणि कडू वासा मुळे कुठलेही कीटक असो ते घरातून बाहेर निघून जाते.

कडुलिंबाची उन्हात वाळवून कोरडी पाने घ्या व त्याचा चुरा करून घ्या. तुमच्याकडे ताजी पाने असतील तरी चालतील पण ते बारीक करून त्या पाण्यामध्ये टाका. नंतर हे सर्व झाल्यानंतर हे छान उकळून घ्या. हे मिश्रण उकळून झाल्यानंतर ह्यात एक ग्लास पाणी टाका. नंतर हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचे आहे. नंतर हे सर्व मिश्रण सप्रेच्या बॉटल मध्ये भरून घ्या.

आणि घरात ज्या ठिकाणी झुरळ असेल पाल असेल डास असतील त्या ठीकणी तुम्ही स्पे करायचे आहे. याच्या वासामुळे कितीही डास असो किंवा कुठलेही कीटक असो तर ते अगदी सहजपणे निघून जाण्यास मदत होईल. आणि याचा आपल्यावर कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. आणि या स्प्रे मुळे डाग देखील पडणार नाहीत. याने आपल्या लहान मूलांना त्रास होणार नाही हा आपल्यासाठी फायदाच आहे. इतर विषारी स्प्रे ते आपल्यावर परिणाम करु शकते.

मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. आणि माहिती आवडली असेल तर कॉमेंट नक्की करा व इतरांना नक्की शेअर करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!