Home / अध्यात्म / घरात नवस कसा बोलवा ? नवस कसा पूर्ण करावा ? इच्छा नक्की पूर्ण होतील.

घरात नवस कसा बोलवा ? नवस कसा पूर्ण करावा ? इच्छा नक्की पूर्ण होतील.

जेव्हा आपण एखादा नवस बोलत असतो तेव्हा आपण आपल्या इच्छा पूर्ण करत असतो अशा वेळी तो नवस पुर्ण झाल्यावर पूर्ण सुद्धा करावे लागतात. नवस म्हणजे काहीतरी पूजा करण्याची इच्छा. मला हे द्या मी काहीतरी करेल असे काहीतरी म्हटले जाते. हा नवस मंदिरात जाऊन पूर्ण केला जातो आणि हा नवस जो देव प्रसन्न होतो तसेच आपल्या इष्ट देवता व कुलदेवतेला हा नवस करायचा असतो परंतु तुम्हाला घरात सुद्धा नवस करता येतो.

अनेकदा प्रश्न निर्माण होतो की घरात नवस कसा करावा याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला लेखा मध्ये सांगणार आहोत म्हणूनच आपण नवस करताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे ? कसा पूर्ण करायचा आहे? व तो कसा बोलायचा आहे याबद्दल सविस्तर आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

मंदिर ही आपल्या घरीच असते. आपण आपल्या घरातील देवांना पूजाच असतो त्यांची पुजा-अर्चना करत असतो. आपल्याला नवस बोलण्यासाठी फक्त एकच वस्तू लागणार आहे ते म्हणजे पूजेचे नारळ. संपूर्ण पूजेचे नारळ यांचे आपण जेव्हा बाजारातून नारळ आणतो तेव्हा ते सोलायचे नाही त्याच्या वरील केस काढायचे नाही. ते पूर्ण तसेच्या तसे असले गेले पाहिजे असा संपूर्ण नारळ आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसायचे आहे.

मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण आणलेला संपूर्ण नारळ हातामध्ये ठेवायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे त्यानंतर आपण आपल्या नवस पुर्ण झाल्यावर काय करणार आहोत ते सुद्धा आपल्याला देवाला सांगायचे आहे. अनेक जण नवस पुर्ण झाल्यावर त्यांचे पूजन करणार आहेत,

यात्रा करणार आहेत ,काही नवस फेडणार आहे ,तुला काही अन्नदान करणार आहेत ,असे अनेक गोष्टी सांगत असतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या गोष्टी आपल्याला शक्‍य होणार आहे त्याच गोष्टीत आपण देवासमोर नवस देण्याबाबत व्यक्त केले गेले पाहिजे म्हणूनच नवस फेडना बद्दल विचारपूर्वक बोलले गेले पाहिजे अन्यथा आपल्याला विपरीत परिणाम सुद्धा भोगावा लागू शकतो आणि हे सगळं बोलल्यानंतर नारळ देवघरात ठेवून द्यावा

आणि आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर हा नारळ समुद्रामध्ये किंवा तलावांमध्ये विसर्जित करून द्यावा आणि आपण जे काही नवस व्यक्त करताना जे बोलले होते त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकता म्हणून हा उपाय तुम्ही करून पहा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!