Home / आरोग्य / धरतीवरच अमृत, लाखोंची औषधे पण यापुढे आहेत फेल.

धरतीवरच अमृत, लाखोंची औषधे पण यापुढे आहेत फेल.

निसर्गाने आपल्याला अश्या कित्येक वनस्पती दिलेल्या आहेत, ज्यांचा उपयोग आपण औषधी म्हणून करतो. आजकाल आपण साधी सुई टोचली तरी डॉक्टरकडे जातो. भरमसाठ औषधे घेतो. परंतु या औषधांनी आपला आजार बरा होत नाही तर तेवढ्या वेळापूरता कंट्रोल होतो. निसर्गाने आपल्याला औषधांचा आपण योग्य वेळी योग्य वापर केला तर आपण आजार कंट्रोल नाही तर पूर्ण बरा करू शकतो. आज आपण अशाच एका वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत. त्याच नाव आहे सिसम.

मित्रांनो, जर आपण सिसमच्या पानांचा व्यवस्थित वापर केला तर बरेच आजार घरबसल्या बरे होऊ शकतात. जर आपल्याला डोळ्यांसंबंधीत आजार जडले असतील तर सिसम यावर एक कारगर उपाय आहे. आज आपली भरपूर कामे मोबाईल व लॅपटॉपवरच होत आहेत. ज्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होत आहे. जर आपले डोळे कमजोर होत असतील तर सिसमच्या पाल्याचा रस त्यावर एक उत्तम उपाय आहे.

कृती-
१. सिसमची काही पाने चांगल्या पद्धतीने धुवून घ्या. २. त्यांना व्यवस्थित कुटून त्याचा रस काढून घ्या. ३. त्या रसामध्ये अर्धा चमचा मध टाकून व्यवस्थित एकत्रित करून घ्या व दिवसातून दोन वेळा डोळ्यात घाला.

आयुर्वेदात सांगितलेल आहे की, आपलं पोट हेच आपल्या शरीरातील आजारांची जननी आहे. जर आपले पोट व्यवस्थित नसेल तर आपल्याला एक सोडून शंभर वेगवेगळे आजार जडतात. जर आपल्याला अपचन असेल तर आपल्याला अनेक आजार होतात. आज आपण जेवढ्या गोष्टी खातो, त्यापैकी अनेक गोष्टींमध्ये वेगवेगळी रसायने घातलेली असतात. आपण फास्ट फूड खूप चवीने खातो पण हे पचायला खूप जड असते. जर हे अपचित राहिले तर चेहऱ्यातून बाहेर पडताना पुरळ किंवा किडनीत जमा होऊन मुतखडा सारखे आजार होतात. आणि अशानेच आपले शरीर अनेक आजारांचे माहेरघर बनते. यासाठी आपल्याला सिसमच्या पाल्याचा काढा प्यायला हवा.

कृती- १. सिसमची काही पाने चांगली धुवून घ्या. २. ही पाने स्वच्छ पाण्यात उकळून घ्या आणि हे गाळून घ्या. ३. यामध्ये एक चमचा मध टाकून हा काढा प्या.
हा काढा प्यायल्याने आपल्या पोटाचे बरेच आजार ठीक होतात. हाच काढा प्यायल्याने आपलं रक्त शुद्ध होत आणि अनेक आजरांपासून बचाव होतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!