Home / आरोग्य / मोस,मस्सा आणि चामखीळ घालवण्यासाठी सर्वात सोप्पा उपाय एका रात्रीत गळून पडेल

मोस,मस्सा आणि चामखीळ घालवण्यासाठी सर्वात सोप्पा उपाय एका रात्रीत गळून पडेल

पेपिलोमा विषाणू हे त्वचेवर चामखीळ येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. चेहरा, मान, हात, पाठ, पाय यावर चामखीळ येऊ शकतात. चामखीळपासून मुक्ती हवी म्हणून लोक बर्‍याच महागड्या उपचारांचा अवलंब करतात, तरी पूर्णपणे या समस्येपासून मुक्ती मिळत नाही. चामखीळमुळे वेदना होत नाहीत. मात्र तरी शरीराच्या दिसणाऱ्या भागावर चामखीळ असेल तर कसंतरीच वाटतं.

चामखीळ पूर्णपणे काढण्यासाठी तुम्ही घरगुती उपचारही करू शकतात.

ॲपल सिडेर व्हिनेगर:- अॅपल सिडेर व्हिनेगर हे त्वचेसाठी अतिशय प्रभावी औषध आहे. यात अनेक प्रकारचं दाहक आणि संसर्गविरोधी गुणधर्म आहेत. जे त्वचेचे डाग काढून टाकतात. व्हिनेगर वापरताना त्यात थोडंसं पाणी मिसळा आणि चामखीळच्या जागी थोडावेळ बोटानं हळूहळू मालिश करा. कोरडं झाल्यानंतर धुवा. दिवसातून दोनदा हा उपाय करा.

केळीची साल:-केळी अनेक गुणांनी समृद्ध आहेत. त्याची सालेही फायदेशीर असतात. केळीची साल त्वचेसाठी चांगली असतात. केळीची साल चामखीळ पासून मुक्त होण्यासाठी एक उत्तम औषध आहे. केळीची साल चामखीळ सुकवण्यास उपयुक्त आहेत. केळीची साल बाधित भागावर ठेवा आणि या जागेला कापडानं बांधा. हे नियमितपणे अवलंबल्यास काही दिवसांत चामखीळ कोरडी होऊन निखळून पडेल.

बेकिंग सोडाा:-चामखीळ काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर खूप प्रभावी आहे. यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये एरंडेल तेलाचे काही थेंब मिसळावे आणि हे मिश्रण चामखीळवर लावून हलक्या हातांनी मालिश करा. एका तासानंतर तो भाग स्वच्छ पाण्याने धुवा. एक महिना नियमितपणे हा उपाय केल्यास फरक जाणवेल.

लसूण:-, लसणीत अँटीफंगल आणि जीवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत, जो त्वचेवरचे चामखीळ काढण्यात मदत करतो. दोन लसूण पाकळ्यांची पेस्ट करून ती चामखीळवर लावा. तासाभरानं तो भाग स्वच्छ पाण्यानं धुवा. आपण दिवसातून दोनदा हा उपाय करू शकता.

आणखी एक उपाय म्हणजे हळद मध विटामिन सी ची गोळी हे तीन घटक एकत्र करून पेस्ट बनवायची आहे. अगदी स्वच्छ बोटांच्या मदतीने किंवा एखाद्या कापडाच्या च्या मदतीने ही पेस्ट मसावर लावायची आहे. ही पेस्ट इतरत्र किंवा आपल्या कपड्यांना लागू नये म्हणून त्यावर तुम्ही बँडेज सुद्धा चिटकवू शकता या पेस्टचा पहिल्या वापरानंतर ही पेस्ट तुमच्या त्वचेला मानवली तर हा उपाय दररोज सकाळ संध्याकाळ करायचा आहे सात ते आठ दिवसात चामखीळ गळून पडलेली तुम्हाला दिसेल या उपायाचा तुम्हाला फक्त आणि फक्त फायदाच होणार आहे

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!