Home / आरोग्य / लाखो रुपयांची औषधे सुद्धा या वनस्पती समोर काहीच नाही जर तुम्हाला ही वनस्पती कुठे सापडली तर अवश्य लाभ घ्या. .

लाखो रुपयांची औषधे सुद्धा या वनस्पती समोर काहीच नाही जर तुम्हाला ही वनस्पती कुठे सापडली तर अवश्य लाभ घ्या. .

नमस्कार, स्वागत आहे वाचकवर्ग..

पावसाळ्याच्या वातावरणामध्ये सगळीकडे हिरवळ पसरलेली असते आणि हे वातावरण आपल्याला खूपच मोहित करत असते. आपल्या आजूबाजूला हे हिरवे वातावरण नवीन नवीन वनस्पती झाडे झुडपे आल्यामुळे तयार होत असते आणि आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती आहेत की ते आपल्याला त्यांच्या सुंदर मोहक रूपाने प्रफुल्लित करत असतात. आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती आहेत त्यांचा उपयोग आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप पूर्वीच्या काळापासून करण्यात आलेला आहे परंतु आपल्याला या वनस्पती बद्दल फारशी माहिती नसल्याने आपण त्यांचा उपयोग करत नाही.

आज आपल्या या लेखामध्ये आपण अशाच एका दुर्लक्षित वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत. ही वनस्पती पावसाळ्यामध्ये आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहायला मिळते परंतु या वनस्पती बद्दल फारशी माहिती नसल्याने आपण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करत नाही. चला तर मग जाणून घेऊया ही वनस्पती नेमकी कोणती आहे आणि या वनस्पतीचे आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे त्याबद्दल…

ही वनस्पती पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा आपल्या आजूबाजूला पाहायला मिळते. या वनस्पतीचे नाव आहे कुंदरू. ही वनस्पती वेल स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या वनस्पतीचे फळेसुद्धा अगदी पडवळ प्रमाणे दिसायला असतात. या फळांचा रंग हिरवा असून या वनस्पतीच्या फळांची अनेकदा भाजी सुद्धा बनवली जाते. या वनस्पतींच्या फुलांचा रंग पांढरा असतो. या वनस्पतीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगळ्या नावाने ओळखले जाते.अनेक भागांमध्ये या वनस्पतीच्या फळांची भाजी केली जाते कारण की या फळांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात परंतु आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या वनस्पतीचे फळे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेतच पण त्याच बरोबर या वनस्पतीची मुळे, खोड, पाने ,फुले या सर्वांचा उपयोग सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगला होतो.

या फळाच्या सेवनाने आपली कान दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. जर तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार म्हणजे खाज ,खरूज, नायटा ,गजकर्ण असेल तसेच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये जाणवत असेल आणि यामुळे तोंड देत असेल तर या सगळ्या समस्या व सुद्धा ही वनस्पती अत्यंत रामबाण औषध ठरते. जर तुम्हाला तोंड येण्याची समस्या वारंवार त्रास देत असेल तर अशा वेळी या वनस्पतीची फळ जर आपण चावून चावून त्याचा रस गिळला तर काही दिवसांमध्येच तोंड येण्याची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाते तसेच आपला कान वारंवार दुखत असेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा रस मध्ये आपण तिळाचे तेल मिक्स करून दोन थेंब नियमितपणे कानामध्ये टाकल्यास कान दुखी लवकर बरी होते.

जर आपले डोके सतत दुखत असेल तर अशा वेळी या वनस्पतींची मुळे घेऊन त्याचा लेप आपल्याला आपल्या कपाळाला लावायचा आहे ,असे केल्याने डोकेदुखी बरी होते. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्वचा विकार झालेला असेल खाज, खरुज ,नायटा असेल तर अशा वेळी या वनस्पतीची पाने आपल्याला तेलामध्ये टाकून चांगल्या पद्धतीने उकळायचे आहेत आणि त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे व ज्या ठिकाणी आपल्या शरीरावर खाज जास्त प्रमाणामध्ये येते अशा प्रभावी जागेवर हे तेल आपल्याला लावायचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकतो.

जर तुम्हाला गुडघे दुखी ,सांधे दुखी व कंबर दुखी ही समस्या उद्भवत असेल आणि यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होत असेल तर अशावेळी आपल्याला या वनस्पतीची मुळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचा लेप तयार करायचा आहे आणि हा लेप आपल्याला गुडघ्यावर, कंबरेवर आणि सांध्यांवर लावायचा आहे,असे काही दिवस केल्याने पूर्णपणे त्रास दूर होईल. अशाप्रकारे ही वनस्पती आपल्या शरीरासाठी एक संजीवनी औषधाप्रमाणे कार्य करते. जर तुम्हाला ही वनस्पती आपल्या आजूबाजूला कुठेही उपलब्ध झाली तर या वनस्पतीचा वापर अवश्य करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!