Home / आरोग्य / घाण व पिवळे दात लगेच बनवा सफेद व चमकदार, दात चांदीसारखे चमकायला लागतील.!

घाण व पिवळे दात लगेच बनवा सफेद व चमकदार, दात चांदीसारखे चमकायला लागतील.!

आजच्या तरुणाईला बिडी, सिगारेट, तंबाखू आणि पान खायची व्यसने जडलेली आहेत. यामुळे दात लवकर पिवळे पडतात व खराब होतात आणि तोंडातून सतत वास येत राहतो. आज या लेखातून आपण दातातील दुर्गंधी व घाण कशी नाहीशी करता येते, याची माहिती घेणार आहोत. जर दात दुखत असतील, दाताला किडे लागले असतील किंवा कॅव्हिटी व पायरिया सारख्या समस्या देखील दूर होतील.

सामग्री-
१. आले-
आल्याला नैसर्गिक वेदनाशामक म्हटले जाते. हे लगेच दुखणे कमी करते. दादातील कुठलेही इन्फेक्शन आल्याने लगेच दूर होते. दातांतील पिवळेपणा देखील या आल्यामुळे जातो. आपल्याला दोन तुकडे आले घ्यायचे आहे. त्याची साल काढून टाकायची आहे व त्याला किसून घ्यायचे आहे. मिक्सरला बारीक करून घेतल्यासही चालेल.

२. मीठ-
पाव चमचा मीठ आपल्याला यासाठी घ्यायचं आहे. मिठामुळे दातावर चढलेले काळ्या व पिवळ्या रंगाचे थर निघून जातात. त्याचबरोबर दातांना मजबूत बनवण्याचं काम मीठ करत असते.

३. लिंबू –
लिंबू दातांना नैसर्गिक पद्धतीने ब्लिच करते. यामुळे दात सफेद होतात. तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा नायनाट या लिंबूमुळे होतो. संपूर्ण तोंडातील जिवाणू- विषाणू यामुळे मारले जातात. आपल्याला काही टिपके लिंबूचा रस घ्यायचा आहे.
४. कुठल्याही कंपनीची पेस्ट-

कृती-
१. किसलेले आले आणि मीठ नीट एकत्रित करून घ्या.
२. त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे.
३. रोज आपण ब्रशवर घेतो, तेवढीच पेस्ट आपल्याला या मिक्स करायची आहे. आणि मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्या.

वापर कसा कराल?
आठवड्यातुन तीन वेळा आपल्या नेहमीच्या पेस्ट ऐवजी या पेस्टचा वापर करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!