Home / आरोग्य / जर तुम्ही सुद्धा उपाशीपोटी कॉफी पीत असाल तर आताच व्हा सावधान, त्यामागील हे आहे एक महत्वाचे कारण!!

जर तुम्ही सुद्धा उपाशीपोटी कॉफी पीत असाल तर आताच व्हा सावधान, त्यामागील हे आहे एक महत्वाचे कारण!!

जसजसा काळ बदलत आहे त्या काळाबरोबरच आपली खाण्या-पिण्याची सवय सुद्धा बदलत आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपण वारंवार चहा पीत असतो परंतु आज अनेक जण चहा पिण्या ऐवजी कॉफी पीत आहेत आणि म्हणूनच अनेकदा आपल्याला रस्त्याच्या आजूबाजूला कॉफी शॉप पाहायला मिळतात आणि या कॉफी शॉप वर तरुणांची प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा पाहायला मिळते म्हणूनच भारतामध्ये कॉफीचे अनेक ब्रँड आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यामुळे स्टार बक, सीसीडी यासारखी शॉप आपल्या तरुणांसाठी प्रसिद्ध कट्टा झालेला आहे म्हणूनच कॉफी आपल्याला बरोबरच अनेक फायदे सुद्धा पुरवत असते.

आपण जी कॉफी पितो ती आपल्या शरीरासाठी काही प्रमाणात उपयुक्त आहे पण त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये एक कॉफी प्रचंड चर्चेत आहेत त्या कॉफीमुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात, ती कॉफी म्हणजे ग्रीन कॉफी. आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये आयुर्वेदिक दृष्टिकोनातून ग्रीन कॉफी चे महत्व सांगणार आहोत. कॉफी मध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे केमिकल्स असतात त्यातील पहिला हे कॉफी कॅफेन सीड्स,कलोरोजेनिक एसिड, आणि कॉफ्फेन जरी आपण ग्रीन कॉफी बद्दल चर्चा केली तर यात कलोरोजेनिक एसिडची मात्रा जास्त प्रमाणामध्ये असते. यामुळे कारण सुद्धा चांगले आहे कारण की या बियांना उकळले जात नाही आणि म्हणूनच यामध्ये याचे प्रमाण जास्त असते यामुळे आपल्या शरीरातील मेटाबोलिजम चा दर चांगला राहतो. यामुळे आपल्याला भूक सुद्धा व्यवस्थित लागते. वारंवार भूक लागत नाही तसेच आपले वजन सुद्धा नियंत्रणात राहते.

ग्रीन कॉफी मुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत आणि ही कॉफी बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. ज्या प्रमाणे आपण चहा व अन्य कॉफी बनवतो त्याच पद्धतीने आपल्या एका पातेल्यामध्ये दोन कपभर पाणी घेऊन त्यामध्ये एक ते दोन चमचा ग्रीन कॉफी पावडर टाकायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने आपल्याला गाळायचे आहे तर अशा पद्धतीने ही ग्रीन कॉफी सहजरीत्या लवकर तयार होते. चवीसाठी तुम्ही यामध्ये लिंबू किंवा मध सुद्धा टाकू शकता. ती ग्रीन कॉफी पिण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत. आपल्यापैकी अनेक जण वाढते वजन आणि अति लठ्ठपणा यासारख्या समस्यांना त्रासलेले आहेत.

ही समस्या कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये डायट ,योग्य आहार आणि भरपूर व्यायाम करत असतात परंतु एवढे करून सुद्धा त्यांना हवा तो काही फरक जाणवत नाही जर तुम्ही सुद्धा असे प्रयत्न करत असाल तर आजच थांबा आणि ग्रीन कॉफी सेवन अवश्य करा कारण की आणखी कॉफीचे सेवन केल्याने तुमचे अतिरिक्त वजन कमी होणार आहे आणि शरीरावर निर्माण झालेली चरबी सुद्धा कमी होईल कारण यामध्ये आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम दर वाढवण्याची क्षमता असते आणि यामुळे आपण जे काही खाल्लेले असेल ते लगेच पचत सुद्धा असते.

जर तुम्ही महिनाभर सातत्याने दिवसभरातून एकदा जरी ग्रीन कॉफी नियमितपणे प्यायली तर तुमच्या शरीरातील असंख्य समस्या दूर होण्यास मदत होईल. बहुतेक वेळा अति लठ्ठपणा यामुळे आपल्याला मानसिक समस्या उद्भवतात. अनेकदा आपण चिंता करू लागतो आणि या सर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होतो म्हणून जर तुम्हाला ही चिंता दूर करायची असेल तर सकाळी उठल्यावर ग्रीन कॉफी अवश्य सेवन करावे त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांना ब्लड प्रेशरची समस्या उद्भवत असते काही जणांना लो ब्लडप्रेशर हाय ब्लडप्रेशर ची समस्या असते जर तुम्हाला ब्लडप्रेशर ची समस्या असेल तर तुम्ही नियमितपणे ग्रीन कॉफी प्यायल्याने तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणामध्ये येते आणि आपल्या शरीरातील कार्य सुद्धा सुरळीतपणे चालण्यासाठी मदत होते.

एखादे कार्य करत असताना मन वारंवार विचलीत होत असेल, काम करण्याची इच्छा निर्माण होत नसेल तर कोणतेही काम करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला म्हणजेच ग्रीन कॉफी अत्यंत गरजेचे आहे.जर तुम्ही नेहमी ग्रीन कॉफी प्यायल्याने तुमची स्मरणशक्ती व इच्छाशक्ती एकत्र होते आणि काम सुरळीतपणे चांगले पार पडतील. तरीही ग्रीन कॉफी पिण्याचे फायदे परंतु जर एखादी गोष्ट आपण प्रमाणापेक्षा जास्त केली तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर होतो म्हणून जास्त प्रमाणामध्ये ग्रीन कॉफी चे सेवन करू नये अन्यथा शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकता.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!