Home / आरोग्य / चाफ्याच्या झाडाचे आणि फुलांचे असेही औषधी फायदे लाख औषधे याच्यापुढे अपयशी ठरतील,

चाफ्याच्या झाडाचे आणि फुलांचे असेही औषधी फायदे लाख औषधे याच्यापुढे अपयशी ठरतील,

आतापर्यंत आपण चाफा फक्त गाण्यात ऐकलाय किंवा बागेत पाहिलंय. चाफ्याचे आयुर्वेदिक फायदे देखील आहेत, हे ऐकून आपण थक्क व्हाल. चाफ्याचं झाड घराची शोभा चांगलीच वाढवते. परंतु ही गोष्ट खूप कमी जणांना माहीत असेल की, चाफ्याचे फुल व झाड यांचे देखील आयुर्वेदात अनेक फायदे आहेत. पिवळा रंग आणि सुगंध हे चाफ्याच्या फुलांचे वैशिष्ट्य आहे.

आयुर्वेदानुसार चाफ्याच्या फुलातील गुणधर्मांमुळे डोकेदुखी, कानाच दुखणं आणि डोळ्यांचे विकार यांना खूप फरक पडतो. मुतखडा किंवा मूत्रासंबंधीचे आजारमध्ये सुद्धा चाफ्याच्या विभिन्न अंगाचा वापर केला जातो.

चाफ्याचे विविध फायदे-
१. चला तर पाहुयात पहिला उपाय आणि फायदा चाफ्याच्या झाडाची साल, मुळे, पाने आणि फुले यांना एकत्र कुटून त्याचा रस काढून तेवढ्याच प्रमाणात राईच तेल आणि त्याच्या चारपट खोबरे तेल व्यवस्थित मिसळून तेल तयार करा. हे तेल लावल्याने अंगदुखी, कंबरदुखीपासून आराम मिळतो.

२. टॉन्सिलसाठी पण याचा फायदा होऊ शकतो. टॉन्सिलसाठी चाफ्याच्या झाडाचा चीक फायदेशीर ठरतो.
3. लहान मुले तसेच मोठ्या वयस्कर लोकांचे नाकाचे मास वाढते, कोणत्याही कारणाने जर नाकाचे मास वाढले असेल तर चाफ्याच्या फुलांचा सुगंध घेणे चांगले असते.

४. चाफ्याच्या फुलांचा वास घेतल्याने हृदय आणि डोकं थंड व शांत राहते.
५. जर आपले अंग किंवा हात पाय अकडले तर चाफ्याच्या तेलाने मालिश केल्यास आराम मिळतो.
६. शरीरावर आलेल्या गाठी जर दुखत असतील, चाफ्याच्या तेलाने मालिश केल्यास फरक पडतो.

७. खोकला किंवा सर्दी असल्यास चाफ्याच्या मुळांचा काढा पिल्याने त्वरित आराम मिळतो.
८. चाफ्याच्या सालीचे चूर्ण बनवून दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने रक्त साफ होते.
९. चाफ्याची साल किसून दह्याबरोबर लावल्याने फोड येणे कमी होते.
१०. लिंबू सोबत चाफ्याची फुल बारीक करून लावल्याने चेहरा फ्रेश व तजेलदार दिसतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!