Home / आरोग्य / केसांसाठी संजीवनी बुटी, दुसरे औषधे यापुढे काही नाही करा फक्त एक चमत्कारिक उपाय.

केसांसाठी संजीवनी बुटी, दुसरे औषधे यापुढे काही नाही करा फक्त एक चमत्कारिक उपाय.

अनेकदा केस वारंवार गळणे, केसांमध्ये कोंडा निर्माण होणे, अकाली केसांना पांढरेपणा येणे यासारख्या समस्या मुळे महिलावर्ग नेहमी त्रासलेला असतो. या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतात परंतु या उपायांचा हवा तेवढा फरक आपल्याला जाणवत नाही आणि परिणामी अनेकदा आपण रासायनिक पदार्थांचा वापर करून केसांची वाट लावून घेतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

या लेखामध्ये आपण जाऊ पायात जाणून घेणार आहोत.हा उपाय आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे व या उपायासाठी जे पदार्थ वापरणार आहोत ते सुद्धा अगदी नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी सहज उपलब्ध होणारे आहे आणि म्हणूनच तुमच्या केसांचे आरोग्य पहिल्यापेक्षा चांगले होण्यासाठी मदत होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया आपले केस चार दिवसांमध्ये लांबसडक व मजबूत बनण्यासाठी नेमका कोणता तो उपाय आपल्याला उपाय करायचा आहे त्याबद्दल…

आपल्या सर्वांच्या घरी कोरफड सहज उपलब्ध असते आणि अनेकांच्या बागेमध्ये, गॅलरीमध्ये कोरफड चे झाड आपल्याला पाहायला मिळते. कोरफड हे आयुर्वेदिक अशी वनस्पती आहे की ज्या वनस्पती मध्ये आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर करण्याची क्षमता आहे. हा उपाय करण्यासाठी आपण कोरफड वापरणार आहोत. कोरफड कापल्यानंतर आपल्याला काही वेळ तसेच ठेवायचे आहे आणि जो काही पिवळा गर निघत असेल तो काही वेळ तसाच निघून द्यायचा आहे कारण की यामध्ये काही विषारी घटक असतात जे निघाल्यावर आपल्याला कोरफड वापरायचे आहे. आता आपल्याला कोरफड स्वच्छ पाण्याने धुवायची आहे आणि कोरफड च्या आजूबाजूला जो काटेरी भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे.

हा उपाय करताना पण कोरफड वरील जो हिरवा भाग असतो तो अजिबात काढायचा नाही कारण की या हिरव्या भागांमध्ये सुद्धा असे अनेक औषधे उपलब्ध असतात ज्यामुळे आपल्या शरीराला चांगले तत्व व गुणधर्म प्राप्त होतात. आपण आपल्या केसांच्या लांबीनुसार कोरफड चा वापर करायचा आहे.आता आपल्याला कोरफडचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. कोरफड चा उपयोग आपण सगळेजण करू शकतो आणि बाजारामध्ये सुद्धा कोरफड संदर्भातील अनेक सौंदर्यप्रसाधने उपलब्ध असतात परंतु त्यामध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश असतो आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी उगवणारे कोरफडीचा वापर करायचा आहे कारण की हे शंभर टक्के नैसर्गिक असल्याने त्याचा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही.

कोरफड चा उपयोग लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोक अगदी करू शकतात. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लाल साल असणारा कांदा. आपल्याला हा उपाय करण्यासाठी लाल रंगाची साल असणारा कांदा घ्यायचा आहे कारण की यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते आणि सल्फर हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामध्ये असे काही एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात जे आपल्या केस गळतीचे प्रमाण कमी करते व केसांच्या वाढीसाठी मदत करते. ज्या व्यक्तींचे केस जास्त प्रमाणामध्ये गळलेले आहे अशा व्यक्तीने कांद्याचा रस अवश्य लावायला हवा. जर आपण पंधरा दिवस केसांना कांद्याचा रस लावला तर जे केस उडालेले आहेत ते नव्याने होण्यासाठी मदत होईल. आता आपल्याला कोरफड चे तुकडे आणि कांद्याचे बारीक बारीक तुकडे मिक्‍सरच्या साह्याने त्याची बारीक पेस्ट आपल्याला बनवायचे आहे.

ही पेस्ट व्यवस्थित बनवून झाल्यानंतर गाळणी च्या साह्याने आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता आपल्या हा उपाय तयार झालेला आहे. कापसाच्या साहाय्याने आपण हे मिश्रण आपल्या केसांना लावायचा आहे. केसांना हे मिश्रण लावल्यानंतर अर्धा ते एक तास ठेवायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे. हा उपाय आपण महिनाभर सातत्याने केला तर आपले केस गळण्याचे थांबतील, केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर निघून जाईल आणि केस पूर्वीपेक्षा जास्त चमकू लागेल व जर तुमचे केस पातळ असतील तर ते मजबुत आणि घट्ट होतील आणि त्याच बरोबर त्यांची लांबी सुद्धा वाढेल.

अशा पद्धतीने घरच्या घरी करता येणारा अगदी साधा सोपा तेवढाच प्रभावी उपाय अवश्य करून पहा आणि आपल्या केसांचे आरोग्य जपा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!