Home / आरोग्य / कोणत्याही प्रकारची खाज गायब, खरुज, नायटा यांचासाठी सगळ्यात भारी उपाय या वनस्पतीचा.

कोणत्याही प्रकारची खाज गायब, खरुज, नायटा यांचासाठी सगळ्यात भारी उपाय या वनस्पतीचा.

आजच्या लेखामध्ये आपण असा एक गुणकारी उपाय जाणून घेणार आहोत. या उपायामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची खाज निर्माण झाली असेल तर ती पूर्णपणे दूर होणार आहे तसेतर आपल्या शरीरावर खाज येण्याची कारणे वेगवेगळी असतात. बहुतेक वेळा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण भिजत असतो आणि त्यामुळे आपले कपडे ओले असतात. जास्त काळ ओले कपडे परिधान केल्यामुळे कुठेतरी आपल्या शरीरावर लालसर चट्टे सुद्धा निर्माण होतात आणि परिणामी तेथे कालांतराने खाज सुटू लागते. जर आपण यावर दुर्लक्ष केले तर भविष्यात अंगावर लाल चट्टे निर्माण होणे, खाजेचे प्रमाण वाढणे आणि त्यातूनच वेगवेगळ्या प्रकारचे त्वचाविकार निर्माण होऊ शकतात.

जर तुम्हाला सुद्धा या समस्या उद्भवत असतील तर आजचा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय करणार आहोत तो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे म्हणूनच हा उपाय अवश्य करा, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

हा उपाय करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत ,तो पदार्थ आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होतो. आपल्यापैकी अनेकजण पेरू खातात परंतु आपल्या सर्वांना माहिती असेल की पेरू पेक्षा जास्त गुणधर्म हे पेरूच्या पानांमध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु अनेकदा पेरूच्या पानांना आपण फेकून देतो. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पेरूच्या पानांना खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहे. या पानांच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतात म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपण पेरूची पाने वापरणार आहोत.

पेरूच्या पानांचा मध्ये अँटी इन्फ्ला मेंट्री गुणधर्म असतात ज्यामुळे जर कोणत्याही प्रकारचा त्वचारोग आपल्याला झाला असेल तर तो दूर होण्यास मदत होते व त्याचबरोबर अँटी फंगल गुणधर्म असल्याने सुद्धा त्वचा संबंधित आजार पूर्णपणे बरे होतात.हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात ते आठ पेरूची पाने घ्यायचे आहेत. पेरूची पाने कोवळी असली तरी चालतील त्यानंतर आपल्याला या पेरूच्या पानांना बारीक बारीक चिरून मिक्सर च्या सहाय्याने चांगली पेस्ट बनवायची आहे. एकदाका ही पेस्ट बनवल्यानंतर एका सुती कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे ,आता जो रस तयार झालेला आहे तो आपल्याला वापरायचा आहे.

जर तुम्हाला दात दुखीची समस्या वारंवार होत असेल तर अशा वेळी आपण पेरुची तीन ते चार पाने चावून खाल्ल्याने आपल्या दातातील कीड पूर्णपणे नष्ट होते व त्याचबरोबर दात स्वच्छ दिसू लागतात. दातांना चमक येऊ लागते त्याचबरोबर जर गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी यासारख्या समस्या वारंवार त्रास देत असेल तर अशावेळी पेरूच्या पानांचा रस व त्यामध्ये खोबरेल तेल टाकून हे मिश्रण आपण गरम करून प्रभावित जागेवर लावल्यास आपल्याला त्वरित फरक जाणवतो.

आपल्याला खाज, खरूज, नायटा, गजकर्ण यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचाविकार झाले असतील तर आपल्याला पेरूच्या पानांची पेस्ट बनवायची आहे आणि त्यामध्ये एरंडेल तेल मिक्स करायचे आहे त्यानंतर हे मिश्रण एकजीव झाल्यावर आपल्याला ज्या ठिकाणी खाज जास्त प्रमाणात देते अशा ठिकाणी हे मिश्रण लावायचे आहेत. काही दिवस अशा पद्धतीने आपण हे मिश्रण लावल्यानंतर आपल्या शरीरावरील खाज पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. हा उपाय आपल्याला साधारण एक महिना तरी करायचा आहे यामुळे तुमच्या शरीरावर पूर्णपणे खाज दूर होईल. हा उपाय अत्यंत घरगुती साधा व तितकाच प्रभावी असल्याने याचा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा. ही माहिती जर आवडली असेल, तर जरूर लाइक व शेअर करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!