Home / आरोग्य / जर तुम्हीसुद्धा केसांना मेहंदी लावत असाल तर या गोष्टींची काळजी अवश्य घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

जर तुम्हीसुद्धा केसांना मेहंदी लावत असाल तर या गोष्टींची काळजी अवश्य घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

नमस्कार मित्रांनो, अकाली केस पांढरे होणे ही समस्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत स्त्री-पुरुषांना सतावत आहे. झालेले केस काळे करण्यासाठी अनेकदा आपण वेगवेगळ्या रासायनिक कलरचा वापर करत असतो.

परंतु यामुळे केसांचा रंग बदलतो पण आपले केसांचे आरोग्य खराब होते, परिणामी त्याचा आपल्या शरीरावर सुद्धा विपरीत परिणाम होतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने पांढरे झालेले केस काळे करायचे आहे याबद्दलची माहिती सांगणार आहोत. ही माहिती अत्यंत उपयोगी आहे व या पदार्थाचा वापर करताना आपल्याला विशिष्ट अशा काही गोष्टींची काळजी घेणेसुद्धा गरजेच आहे यामुळे आपले केस काळे होण्यास मदत होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात त्याबद्दल…

आपण केस काळे करण्यासाठी अनेकदा मेहंदी चा वापर करत असतो परंतु मेहंदी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. मेहंदीच्या पानांची पावडर करून बाजारांमध्ये उपलब्ध असते आणि म्हणूनच त्या मेहंदी चे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अनेक उपयोग सांगण्यात आलेले आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ समाविष्ट नसतात यामुळे आपले केस खराब सुद्धा होत नाही.

परंतु जेव्हा आपण मेहंदी केसांना लावत असतो तेव्हा काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे, अन्यथा आपले पांढरे झालेले केस काळे होणार नाही. आपल्याला मेहंदी ही काळया कढई मध्ये टाकायची आहे कारण की कलर करताना मेहंदी हा सर्वात प्रमुख कसा घटक असतो त्याच बरोबर आपल्या घरामध्ये अनेकदा चहा पावडर व कॉफी पावडर उपलब्ध असते. एका पातेल्यामध्ये आपल्याला चहा पावडर व कॉफी पावडर जर तुमच्याकडे बिट पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. या सर्वांचे मिश्रण करून आपल्याला गॅसवर चांगल्या पद्धतीने उकळायला ठेवायचे आहे त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्या नंतर गाळणीच्या साह्याने चहा पावडर व कॉफी पावडर यांचे मिश्रण काढून घ्यायचे आहे.

त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार मेहंदी मध्ये हे मिश्रण मिक्स करायचे आहे.एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की केसांना मेहंदी लावताना लिंबू अजिबात टाकायचा नाही. लिंबू मध्ये जरी केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असणारे औषधी गुणधर्म असले तरी मेहंदी मध्ये लिंबू अजिबात टाकू नका अन्यथा केसांवर परिणाम होऊ शकतो. मेहंदी नेहमी लोखंडी कढईमध्ये टाकायला हवी यामुळे लोखंडी कढईतील चे काही गुणधर्म असतील ते मेहंदी मध्ये समाविष्ट होतात व त्याचा परिणाम आपल्या केसांना मिळतो म्हणजेच केसांना लोह प्राप्त होते. केसांना मेहंदी लावताना कधीही तेल लावलेल्या केसांवर लावू नये. अन्यथा केसांना रंग प्राप्त होत नाही.

मेहंदी लावल्यानंतर तुम्ही केसांना तेल लावू शकता परंतु मेहंदी लावायच्या आधी केसांना तेल लावू नका. मेहंदी नेहमी कढई मध्ये ठेवायला हवी कारण की मेहंदी मध्ये ऑक्साईड प्रक्रिया होऊन मेहंदी ला रंग सुद्धां लवकर प्राप्त होतो आणि रंग निर्माण झालेला आहे तो लवकर निघत सुद्धा नाही. मेहंदी भिजवल्यानंतर जास्तीत जास्त पाच ते सहा तास भिजत ठेवावी जर तुम्ही रात्रभर भिजवत ठेवली तरी अतिउत्तम आहे यामुळे मेहंदी ला रंग चांगला येतो. माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!