Home / बॉलिवूड / लोका सांगे ब्रह्मज्ञान…शिवलीला पाटीलचा जुना व्हिडिओ पाहून नेटकरी करतायत ट्रोल

लोका सांगे ब्रह्मज्ञान…शिवलीला पाटीलचा जुना व्हिडिओ पाहून नेटकरी करतायत ट्रोल

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि कीर्तनकार शिवलीला पाटील सहभागी झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

शिवलीला पाटील:-बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व सुरू होऊन आता दोन आठवडे होत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी या बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर वाद-विवाद, चर्चा होणारंच. बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही सोशल मीडियावर बोललं जात आहे. समाजात वावरणं कसं होतं आणि बिग बॉसच्या घरात हे सदस्य कसे राहत आहेत, हे प्रेक्षक पाहत आहेत. बिग बॉसच्या घरात दाखल झालेली एक स्पर्धक म्हणजे शिवलीला पाटील याच कारणामुळं चर्चेल आली आहे.

शिवलीला प्रसिद्ध किर्तनकार आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. किर्तन करण्याची तिची एक वेगळी स्टाईल आहे. पण सध्या तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती महिलांबद्दल काही वक्तव्य करताना दिसतेय. आजकालच्या महिला पदर मागे ,केस मोकळे सोडून फिरतात, असं शिवलीला या व्हिडिओत बोलताना दिसतेय.

‘बिग बॉस मराठी’ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ:-नेटकऱ्यांनी नेमकं हेच घेरलं आणि तिचा बिग बॉसमधला व्हिडिओ देखील व्हायरल केला. या व्हिडिओत ती केस मोकळे सोडून नाचताना दिसत आहे. किर्तन, किर्तनकार या शब्दांशी वारकरी संप्रदायच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळं असं वर्तन न पटणारं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!