Home / आरोग्य / हा उपाय करा आणि मिळवा दाद ,खाज आणि खरूज पासून त्वरीत सुटका…..

हा उपाय करा आणि मिळवा दाद ,खाज आणि खरूज पासून त्वरीत सुटका…..

दाद,खाज आणि खरूज हे त्वचेचे रोग आहे, ज्यात बुर्शीजन्य इंफेक्शन होते. सामान्यपणे हे इंफेक्शन त्वचेच्या वरच्या थरावर होते. हा रोग एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये खुप लवकर पसरतो. या इंफेक्शनला ‘टिनिया’ असे देखील म्हटले जाते. हे आपल्या त्वचेवर गोल आणि लाल पुरळ सारखे दिसून येते आणि मग यावर आपल्याला खाज येते आणि ते जळल्यासारखे होते.

त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाय घेणे गरजेचे असते. बाजारात तर यावर अनेक क्रीम उपलब्ध आहे,परंतु या क्रीम चा वापर केल्याने आपल्याला फक्त काही काळासाठी आराम भेटतो. काही दिवसानंतर पुन्हा आपल्या त्वचेवर लाल चट्टे दिसायला लागतात. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी असा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, जे केल्याने ही खाज लगेच निघून जाईल.

● दाद, खाज आणि खरूज होण्यामागची कारणे:-
१) शरीराची नीट स्वच्छता न ठेवणे.
२) जर आपण खाज-खरूज असलेल्या माणसाचे कपडे, टॉवल किंवा साबन वापरले तर हे इंफेक्शन होऊ शकते.
३) इंफेक्शन असलेल्या जागेवर साबनाचा वापर करने.

● उपायासाठी लागणारी सामग्री :-
१) पपई :- आपल्याला एक कच्ची पपई लागेल. यामध्ये मोठ्या प्रमाणावर एंटी फंगल आणि एंटी बैक्टीरियल तत्त्व असतात.
२) हळद :- अर्धा टी स्पून हळद.
३) विटामिन ई चे कैप्सूल.
४) अर्धा चमचा एलोवेरा जेल

● कृती :-
सगळ्यात आधी पपई मिक्सर मधून बारीक करून घ्या. आता एका वाटीमध्ये २ चमचे बारीक केलेली पपई, अर्धा चमचा हळद, विटामिन ई च्या कैप्सूल मधील तेल आणि अर्धा चमचा एलोवेरा जेल चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या.आता ही रेमेडी तैयार झाली आहे. सगळ्यात आधी खाज असलेली जागा गरम पाणीने स्वच्छ करून घ्या ,त्यानंतर तैयार झालेले पेस्ट कापसाच्या मदतीने खाज असलेल्या जागेवर लावा. साधारण १-२ तासानंतर आपण तो भाग थंड पाण्याने धुवून काढावे. पहिल्यांदा प्रयोग केल्यावरच आपल्याला लक्षात येईल की लाल चट्टे कमी होत आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!