Home / आरोग्य / पांढरे केस कायमचे काळे करा एका रात्रीत घरगुती उपाय केस वाढ 100 टक्के

पांढरे केस कायमचे काळे करा एका रात्रीत घरगुती उपाय केस वाढ 100 टक्के

पूर्वीच्या काळी आपली आजी-आई यांच्या जुन्या तसबिरी किंवा अल्बम बघितले तर आपल्याला दिसून येईल की त्यांचे केस देखील तेव्हा भरपूर लांबसडक व निरोगी होते.

केस वाढीसाठी उपाय आयुर्वेदिक किंवा हर्बल हेअर पॅक :केस वाढीसाठी उपाय पूर्वी आपल्या घरांमध्ये मेहंदी किंवा आवळा पावडरचा हेअर पॅक करून केसांना लावण्याची पद्धत होती ज्यामुळे केसांचा रंग गर्द व केस चमकदार व मुलायम होण्यासाठी मदत होत असे. मात्र आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या हर्ब्स व वनौषधीनी युक्त असेल आयुर्वेदिक आणि हर्बल हेयर पॅकचे पॅकेट्स मिळतात. हेअर ग्रोथ बुस्टींग तत्वांनी युक्त हे हर्बल हेअरपॅक आपल्या केसांची ग्रोथ वाढवण्याकरता आपल्याला उपयोगी ठरतात.

ज्यामध्ये आवळा, हिना, नागरमोथा, भृंगराज, ब्राह्मी, जास्वंद,कढीपत्ता, मेथीदाणे, लिंबू, मेहंदी यांसारख्या आयुर्वेदिक वनौषधींचा वापर करून हे हेअर पॅक बनवलेले असतात. फक्त पाण्यासोबत त्याची चांगली पेस्ट करून सहजपणे केसांवर लावावे! १-२ तास केसांवर लावुन केस साध्या पाण्याने धुवावे. या हेअर पॅक्समुळे केसांची रंगत वाढते तसेच केस मजबूत होऊन केसांच्या सर्व समस्या हळुहळू दूर होतात व केसांची ग्रोथ होण्यासाठी उपयोग होतो.

हेअर सप्लिमेंट्स होमिओपॅथिक गोळ्या आणि केस वर्धक उपाय:बरेचदा केसवाढीकरता आवश्यक असलेले कॅरेटिन हे प्रोटीन आपल्या आहारामधुन मिळत नसते त्यामुळे डॉक्टर आपल्याला केसांचे आरोग्य चांगले राहण्याकरता होमिओपॅथिक तसेच आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारचे हेअर रेज्युवेनिटिंग सप्लीमेंट दिले जातात त्यामुळे केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते तसेच केसांच्या अनेकाविध समस्या जसे केस गळती, केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे हे देखील कमी होते.

आपल्या आहारातील कमतरता भरून काढण्याकरता हे सप्लिमेंटरी औषधे किंवा गोळ्या आपल्याला उपयुक्त ठरतात. वेगवेगळे हेअर टॉनिक, कॅप्सुल्स बायोटिन, मेलेनिन, कॅल्शिअम, सल्फरचा आवश्यक पुरवठा या आयुर्वेदिक तसेच हर्बल व होमिओपथीच्या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले कॅरेटिन बायोटीन आपल्या शरीराला या द्वारे पुरवले जाते.

केस वाढीसाठी उपाय – आवळा :केसांच्या आरोग्यासाठी आवळा हा पारंपारिक व अगदी प्राचीन काळापासून वापरला जाणारे एक टॉनिकच मानले गेले आहे. आवळ्याचा जूस, आवळ्याचा मुरंबा, आवळा कॅन्डी, आवळ्याचे सरबत असे वेगवेगळ्या प्रकारचे आवळ्यापासून बनणारे पदार्थ आपल्या आहारात असतील तर आपल्या केसांचे आरोग्य देखील चांगली राहते. केसांची ग्रोथ बुस्ट करण्यासोबतच केस काळे, घनदाट, निरोगी होण्याकरता आवळा उपयोगी आहे. आवळ्याचा वापर करून आमला तेल बनवले जाते.आवळ्यापासून बनवलेला हेअर पॅक आपल्या केसांचे आरोग्य सुधारतो व विटामिन सी आणि जीवनसत्व व खनिजेयुक्त असलेल्या आवळा केसांची लांबी वाढण्यात मदत करतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!