Home / आरोग्य / ‘रत्नों में हीरा और सब्जियों में खीरा’ याचे फायदे समजले तर पायाखालची जमीन सरकेल…

‘रत्नों में हीरा और सब्जियों में खीरा’ याचे फायदे समजले तर पायाखालची जमीन सरकेल…

हिंदीमध्ये एक म्हण आहे, “रत्नों में हीरा और सब्जियों में खीरा”. विदेशामध्ये काकडीला सुपरफूड देखील म्हटले जाते. शरीराच्या आत आणि बाहेर असे दोन्ही ठिकाणी याचे एकापेक्षा एक सरस व उत्तम फायदे आहेत. जेवणासोबत किंवा जेवणानंतर पोट थंड राहावं किंवा उष्णता होऊ नये म्हणून आपण काकडी खाणे पसंद करतो. जेवणासोबत किंवा जेवणानंतर पोट थंड राहावं किंवा उष्णता होऊ नये म्हणून आपण काकडी खाणे पसंद करतो.

आधी आपण काकडीचे फायदे जाणून घेऊया.
१. काकडीचा सर्वात पहिला व महत्त्वाचा फायदा म्हणजे डोळ्यांना थंडावा देणे. म्हणूनच बऱ्याच ब्युटी पार्लरमध्ये आपल्या डोळ्यांवर काकडीचे काप ठेवले जातात.
२. काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने थकवा निघून जातो त्याचप्रमाणे डोळ्याखालील काळी वर्तुळे सुद्धा निघून जातात.
३. डोळ्यांत होणारी जलन सुद्धा काकडीमुळे कमी होते.
४. काकडी आपली तहानसुद्धा भागवते.

५. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्याची ताकद काकडीमध्ये असते. काकडीमध्ये ८०% पाणी असते यामुळे काकडी खाल्ल्याने शरीराला पर्याप्त पाणी मिळते.
६. काकडी खाल्ल्याने जळजळ कमी होते.
७. काकडीने शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर पडतात.

८. काकडी खाल्ल्याने आतडी व्यवस्थित साफ होऊन जातात.
९. एक काकडी शरीरातील कितीतरी जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढते.
१०. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम योग्य प्रमाणात असतात.
११. काकडी खाल्ल्याने वजन देखील कमी होते.

काकडी खाण्याचे तोटे-
१.रात्रीच्या वेळी कधी ही काकडी खाण्याची चूक करू नये. आपण ही म्हण तर ऐकलीच असेल की “सकाळी डायमंड, दुपारी काकडी आणि रात्री वेदना”. याचा अर्थ असा आहे, सकाळी काकडी शरीरासाठी सर्वात फायदेशीर असते, दिवसा काकडी खाण्याचे सामान्य फायदे असतात पण रात्री घेताना ते हानिकारक आणि वेदनादायक असते. 
२.काकडीमध्ये एक विषारी पदार्थ असतो ज्याला कुकबर्बिटाइन्स म्हटले जाते. आपण ज्या प्रमाणात काकडीचे सेवन करतात त्याच प्रमाणात हे विष आपल्या शरीरात जातं. यामुळे आपल्या यकृत, पॅन्क्रेटायटीस, पित्त मूत्राशय आणि किडनीसह इतर अनेक अवयवांना सूज येऊ शकते. म्हणून हे सीमित आणि संतुलित प्रमाणातच खायला पाहिजे.

३. काकडीची तासीर थंड असते. म्हणून जर आपण खोकला, सर्दी किंवा श्वसन रोगाने ग्रस्त असाल तर काकडी खाणे टाळा.
४. काकडीच्या बियांमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट नावाचे केमिकल असते, ज्यामुळे आपल्याला मुतखडा होतो. हे केमिकल ककडीबरोबरच गवार, वांगे, पेरू, टोमॅटो आणि भेंडीमध्ये सुद्धा असते. त्यामुळेच बऱ्याचदा मुतखडा असलेल्या रुग्णांना या भाज्या खाण्यास मनाई केली जाते.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!