Home / आरोग्य / हे पान कुठेही दिसो अजिबात सोडू नका, फायदे ऐकून पायाखालची जमीन सरकेल तोंडात बोटे घालाल.

हे पान कुठेही दिसो अजिबात सोडू नका, फायदे ऐकून पायाखालची जमीन सरकेल तोंडात बोटे घालाल.

कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना… हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर येतो मस्तपैकी तयार केलेला विडा. विड्याच्या पानाचं भारताच्या इतिहासाशी आणि परंपरांशी खूप जुनं नात आहे. पानाचा वापर हा फक्त विडा म्हणून नाहीतर अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठीही केला जातो. आजही भारताच्या प्रत्येक गल्लीत, चौकात किंवा मुख्य भागांमध्ये पानपट्टी हमखास दिसतेच.

आपल्या संस्कृतीत पान शुभ मानले जाते. पानाचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. सुपारीच्या पानांमध्ये प्रथिने, कर्बोदके, टॅनिन, कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन आणि पोटॅशियम भरपूर असतात.

आयुर्वेदानुसार, हळदीचा तुकडा भाजून सुपारीमध्ये टाकल्याने सर्दी आणि फ्लूमध्ये आराम मिळतो.जर तुम्हाला रात्री तीव्र खोकला येत असेल तर पानामाद्धे अजमोदा (ओवा) आणि लिकरिसचा तुकडा टाका आणि तो खा.

जेव्हा मुलाच्या बरगड्या हलतात तेव्हा पानांपासून गरम तेल छातीवर लावणे फायदेशीर आहे.2-3 पानाच्या रसामध्ये मध मिसळून दिवसातून दोनदा घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मुलांना फक्त अर्धा चमचा रस द्या.

भूक वाढवण्यासाठी:-ज्या लोकांना भूक न लागण्याची तक्रार असते त्यांच्यासाठी हे पान खाणं खूपच फायदेशीर आहे. सकाळच्या नाश्त्याच्या वेळी तुम्ही काळ्या मिरीसोबत पानाचं सेवन केल्यास तुम्हाला व्यवस्थित भूक लागेल.

मधुमेहावर गुणकारी:-विड्याच्या पानं ही ब्लड शुगर कंट्रोल करण्यातही सहाय्यक असात आणि अँटी डायबिटीक गुणांसाठीही ओळखली जातात. एक संशोधनानुसार जी लोक नियमितपणे पानाचं सेवन करतात त्यांना डायबिटीस होण्याचा धोका कमी असतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!