Home / आरोग्य / शरीरावरील कुठलीही गाठ अगदी सहजपणे निघून जाईल, करा या औषधीचा वापर.

शरीरावरील कुठलीही गाठ अगदी सहजपणे निघून जाईल, करा या औषधीचा वापर.

शरीरावर गाठ आल्यास आपण लगेच घाबरतो. बहुतांश गाठी या चरबीच्या असतात आणि त्यापासून काही धोका नसतो परंतु दिसताना मात्र त्या खूप विद्रुप दिसतात. चरबीच्या या गाठींना “लिपोमा” देखील म्हणले जाते. जेव्हा आपल्या शरीरातील मेटबॉलिझम कमी होते, तेव्हा शरीरातील फॅट/चरबी एक जागी साचू लागते आणि नंतर त्याचेच रूपांतर गाठीमध्ये होते. गाठ शरीरावर कुठेही येऊ शकते परंतु लिपोमाच्या गाठी मात्र हात, पाय, पोट किंवा मांडीला जास्त करून येतात. आपण या आजारांसाठी डॉक्टरांकडे जायलाच हवं परंतु एकदा हा घरगुती उपाय करून पहा.

मित्रांनो, आपल्या सर्वांच्या अंगणात तुळशीचे झाड नक्कीच असते. आपण तुळशीची पाने खाऊ शकता किंवा त्याच्या बियांची व पाल्याची पेस्ट करून लावू शकता. तसे तर तुळस दोन प्रकारची असते, रामतुळस आणि कृष्णतुळस. आयुर्वेदामध्ये तुळशीच्या बियांच व पाल्याच अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळशीच्या पानांना तसेच कधीही चावू नये. यामध्ये असलेल्या पारामुळे आपले दात खराब होतात. एकतर तुळशीच्या पानांचा चहा प्यावा किंवा छोटी तुळशीची पाने पाण्याबरोबर गिळून टाकावी.

त्याचबरोबर तुळशीची पाने पाण्यात उकळून ते पाणी देखील आपण पिऊ शकतो. बहुतेक चर्मरोगांवर तुळशीपासून बांलेलेच औषध दिले जाते. बऱ्याच आजारांवर रामबाण असलेल्या तुळशीला “Queen of Herbs” असे देखील म्हटले जाते. तुळशीच्या पाल्याच्या पेस्टमध्ये हळद, चंदन घालून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग निघून जातात.

गाठींवर उपाय कसा करावा?
सामग्री-
१. तुळशीची पाने
२. हळद
३. एलोवेरा जेल

कृती-
१. तुळशीची पाने धुवून स्वच्छ करून घ्या.
२. त्यानंतर त्यांना खलबत्ता घालून बारीक पेस्ट करून घ्या. मिक्सर मध्ये केल्यासही चालेल.
३. या पेस्टमध्ये एक चमचा हळद व घट्टपणा धरेल इतकं पाणी टाकावं.
४. त्यामध्ये एक मोठा चमचा एलोवेरा जेल घालावे व व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे.

कसे वापरावे औषध?
१. गाठ असलेली जागा व्यवस्थित धुवून काढा व कोरडे करून घ्या.
२. त्यांनतर गाठ असलेल्या जागी हे मिश्रण लावावे.
३. हीच कृती सलग तीन ते चार दिवस करावी.
रात्री झोपताना व दिवसातून दोन वेळा हे औषध आपण गाठींवर लावावे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!