Home / आरोग्य / हिवाळ्यात नियमितपणे गूळ खाण्याचे हे आहेत 9 फायदे, आवर्जून खा

हिवाळ्यात नियमितपणे गूळ खाण्याचे हे आहेत 9 फायदे, आवर्जून खा

1) गूळाचा प्रभाव हा गरम असतो, म्हणून हिवाळ्यात गुळाचे सेवन आपल्याला उबदारपणा देण्यासाठी एकदम प्रभावी आहे. हिवाळ्यात दररोज गुळाचे सेवन केल्याने आपले सर्दी, खोकला आणि सर्दीपासून संरक्षण होते.

2) हिवाळ्यामध्ये सामान्यत: रक्तसंचरण खूप मंद असते. परंतु गुळाचे नियमित सेवन केल्यास रक्तसंचरण अधिक चांगले राखण्यास मदत होते. तसेच रक्तदाब समस्यांमध्ये देखील फायदेशीर आहे.

3) या दिवसात घसा आणि फुफ्फुसांचा संसर्ग फार लवकर पसरतो. गुळाचे सेवन केल्याने ते टाळण्यास आपल्याला खूप मदत होते. गुळाचा वापर सर्दी आणि संसर्गाच्या औषधांमध्ये केला जातो.

4) पाचनच्या संबंधित समस्याच्या उपचारात गुळाचे सेवनही फायदेशीर ठरते. जेवणानंतर थोडा गूळ खाल्ल्याने तुमची पचनशक्ती आणखी चांगली होते.

5) गूळ मॅग्नेशियमचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. गूळ खाल्ल्याने स्नायू, नसा आणि रक्तवाहिन्यांचा थकवा दूर होतो. आणि तसेच गूळ अशक्तपणा दूर करण्यात देखील खूप उपयुक्त आहे.

7. फुफ्फुसातील संसर्ग रोखतो – गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा (Metabolism) वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या (Lungs) संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो.

8. पोटाच्या तक्रारींवर गुणकारी – पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॅसिडीटीची (Acidity) तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो.

9. सांधेदुखीतून सुटका – सांधे दुखत असतील (Joint Pains) तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो. भूक लागणं – जेवणानंतर गूळ खाल्ल्यानं पचन चांगलं होतं. गूळ खाण्यानं भूकही वाढते.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!