Home / आरोग्य / कुठेही ही वनस्पती दिसली तर सोडू नका, एक का होईना पण हे झाड आपल्या अंगणात लावाच..

कुठेही ही वनस्पती दिसली तर सोडू नका, एक का होईना पण हे झाड आपल्या अंगणात लावाच..

आपला देश कृषिप्रधान आहे. त्याचबरोबर येथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती सापडतात. ही जैवविविधताच आपल्याला इतर देशांपासून वेगळं बनवते. आज आपण एका अश्याच झाडाच्या बाबतीत माहिती घेणार आहोत. त्या झाडाचे नाव आहे मरवा किंवा ग्रामीण भाषेत याला वनतुळस देखील म्हणण्यात येते. पावसाळ्यात अगदी सहज कुठेही हे झाड आढळून येते. मरवाच्या झुडुपला इतर नावांनी देखील ओळखले जाते, ज्याप्रमाणे मरुबा, गंधपत्र आणि मरूदक. या झाडाचा खूप वास येत असतो. यामुळे आसपासचे वातावरण प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे या झुडुपाच्या आजूबाजूला मच्छर देखील फिरकत नाहीत. त्यामुळे डेंगू व मलेरिया सारखे आजार कधी होत नाहीत.

झुडुपातील बिया काढून मातीत टाकल्यावर फक्त ८-१० दिवसात नवीन रोपे उगवून येतात. बऱ्याच ठिकाणी लोक याचे बी व पाने अन्नात देखील वापरतात. हे दिसताना अगदी तुळशीसारखेच दिसते. याची पाने व बिया तुळशीच्या पानांच्या व बियांच्या तुलनेत आकाराला मोठी असतात. बऱ्याचदा मरवाची पाने तोडल्यास पिवळ्या रंगाचा एक द्रव बाहेर येतो. त्यालाच आपण तुळस कापूर किंवा मरवा कापुर देखील म्हणतो.

औषधी फायदे-
१. जर तुमचे दात किंवा हिरड्या दुखत असतील किंवा दातांना कीड लागली असेल तर मरवाची पाने पाण्यात उकळून त्याने गुळणा केल्यास लगेच फरक पडतो.
२. खोकला, सर्दी आणि कफ यांवरील आयुर्वेदिक औषधांमध्ये मरवाची पाने, बिया व मुळांचा वापर केला जातो.
३. आले आणि मरवाच्या पानाचा काढा तयार करून प्यायल्याने लवकर फरक पडतो.

४. मरवाच्या पानांचा रस पिल्याने पोटसंबंधीच्या अनेक बाधा दूर होतात.
५. मरवाच्या बिया रात्री पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी गाळून प्यायल्याने अशक्तपणा, कमजोरी व पोटाच्या विविध समस्या लगेच दूर होतात.
६. हिरड्यांची सूज कमी होण्यासाठी मरवाची पाने दाताखाली अवश्य चावावीत.
७. मरवा आणि कडुनिंबाच्या पानांचा रस एकत्र करून केसांना लावल्यावर कोंडा लगेच निघून जातो.

८. याच्या पानांचा रस किंवा अर्क लावल्यावर सुद्धा अनेक चर्मरोगांचा नायनाट होतो.
९. मरवा व पुदिनाच्या पानांचा एकत्रित रस घेतल्याने शरीरातील उष्णता देखील कमी होते.

मरवाचा वापर दैनंदिन जीवनात केल्यास अनेक विकार दूर होतात. ही झाडे लावण्यात देखील सोपी आहेत. भारतात भरपूर ठिकाणी मरवाची शेती देखील केली जाते. मरवाच्या बियांमध्ये प्रोटीन, अ जीवनसत्त्व, ओमेगा 3 फॅटी ऍसिड व फायबर अधिक प्रमाणात असतात. बऱ्याच ठिकाणी डाळीमध्ये किंवा वरणामध्ये देखील मरवाचे बी टाकले जातात.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!