Home / आरोग्य / ज्याला पालापाचोळा किंवा कचरा समजतो, त्याचे आहेत कित्येक फायदे. या औषधी वनस्पतीचे…

ज्याला पालापाचोळा किंवा कचरा समजतो, त्याचे आहेत कित्येक फायदे. या औषधी वनस्पतीचे…

आजकाल या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्याच्या बाजूला अनेक गवत, झाडे, झुडुपे उगवलेली दिसतात. आपण बऱ्याचदा त्यांना कचरा म्हणून सोडून देतो. अशाच एका वनस्पती विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्याचे महत्त्व आयुर्वेदात खूप आधीच सांगितलेलं आहे. चला तर त्याचा बद्दल वाचूयात..

या वनस्पतीच नाव आहे, कांचन/ केना. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये याला कोशपुष्पी म्हणतात, गुजरातीमध्ये याला शिषमुली, बंगालीमध्ये कचरादम, पंजाबीमध्ये चुरा तर मराठीमध्ये केना किंवा कांचन म्हटले जाते. मोकळ्या मैदानात, रस्त्याच्या बाजूला, शेतात किंवा घराच्या परिसरात सुद्धा केना पावसाळ्यात अगदी सहज उगवतो. वैज्ञानिक भाषेत याला Comelina Bengalisis म्हटले जाते.

ग्रामीण भागात या केण्याच्या पानांची भाजी बनवून खाल्ली जाते. मूळव्याध असलेल्या व्यक्तींना याच्या पानांचा रस औषध म्हणून दिला जातो. गॅस, ऍसिडिटी आणि अपचन सारख्या आजारांसाठी देखील याचा वापर केला जातो. वेगवेगळ्या चर्म रोगांवर याच्या पाल्याचा लेप औषध म्हणून देखील लावला जातो. आपल्याला कुठलीही जखम झाल्यावर सुद्धा आपण केण्याच्या पानांचा लेप त्यावर लावल्यास लगेच बरे होऊन जाते.

पावसाळ्यात उगवणारी ही वनस्पती इतर ऋतूंमध्ये आढळत नाही. त्यामुळे आपण याच्या पानांना वाळवून त्यांची पावडर सुद्धा करून ठेवू शकतो. घोळणा फुटल्यावर सुद्धा याच्या पाल्याच्या रसाने फरक पडतो.

पावडर कशी बनवावी?
१. मोठ्या झालेल्या झाडांची पाने तोडून घ्या.
२. त्यांना स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या.
३. नंतर ती पाने वाळवून घ्या.
४. वाळवलेल्या पानांची मिक्सरमध्ये पावडर करून घ्या.

बहुतांश पोटांच्या विकारांसाठी याची पाने पाण्यात उकळून पिल्याने फरक पडतो. पोट साफ होते, अपचन व गॅस त्वरित थांबतो. मूतखडाने पोट दुखत असल्यास देखील याच्या पानांचा रस पिल्याने फायदा होतो. याचे कुठलेही विपरीत परिणाम होत नाहीत.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!