Home / आरोग्य / पांढरे केस काळे करण्यासाठी 2 पानांचा जालीम घरगुती उपाय

पांढरे केस काळे करण्यासाठी 2 पानांचा जालीम घरगुती उपाय

आंब्याच्या पानांचा केसांवर काय परिणाम होतो आंब्याच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्त्व दडलेली आहेत. यातील व्हिटॅमिन ए, बी, सी, कॉपर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फ्लेवोनॉईड, फिनोक अशा अनेक गुणधर्मांचा केसांवर चांगला परिणाम होतो. आंब्याच्या पानांमधील अॅंटि ऑक्सिडंटमुळे केस पांढरे होण्यापासून रोखता येते.

शिवाय यामुळे तुमचे पांढरे केस पुन्हा काळे होतात. आंब्याच्या पानांमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात. यात कोलेजीन योग्य प्रमाणात असल्यामुळे केस काळेभोर, चमकदार आणि मजबूत होतात.

आंब्याच्या पानांचा केसांसाठी कसा वापर करावा आंब्याच्या पानांचा केस काळे करण्यासाठी तुम्ही निरनिराळ्या पद्धतीने वापर करू शकता.आंब्याची पाने केसांवर वापरण्यासाठी आधी तुम्हाला झाडावरील कोवळी आंब्याची पाने आणावी लागतील. त्यानंतर ही आंब्याची पाने मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये तुम्ही मध अथवा नारळाचे तेल मिसळू शकता. आंब्याच्या पानांपासून तयार केलेला हा होममेड हेअर मास्क केसांना लावा.

वीस ते तीस मिनिटांनी केस साध्या पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क केसांना लावा. ज्यामुळे हळू हळू तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने काळे होऊ लागतील. त्यानंतर नियमित हा हेअर मास्क वापरल्यामुळे तुमचे केस पांढरे होणे कमी होईल.

केस कोरडे झाले असतील तर आंब्याची कोवळी पाने आणि पेरूची कोवळी पाने पाण्यामध्ये उकळा. उकळताना पाण्याचा रंग बदलू लागेल. हे पाणी थंड करा आणि कापसाच्या मदतीने या पाण्याचा अर्क केसांच्या मुळांना लावा. केस फारच कोरडे असतील तर तुम्ही हे पाणी नारळाच्या तेलात मिसळून केसांना लावू शकता. ज्यामुळे केस काळे तर होतीलच शिवाय केसांना छान ग्लो येईल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!