Home / जरा हटके / “नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून..

“नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून..

राजन व्यवसायाने बिझनेस मॅन होता. कामानिमित्त तो जास्त वेळ घराबाहेर नेहमी असायचा. कामानिमित्त त्याचे अनेक वेगवेगळ्या लोकांसोबत भेटीगाठी होत असे. कधी कधी तो चुकीच्या माणसाला सुद्धा भेटत असते आणि यामुळे त्याची गाडी ट्रेक वरून खाली उतरत असे. असे करतच एके दिवशी त्याची पत्नी म्हणजेच आमृता हिला आपल्या पतीच्या अफेयर बद्दल माहिती मिळाली. तिला ही माहिती कळताच मनातून कुठेतरी त्रास झालेला असावा.

घरामध्ये भांडणं वाद होतील अशी आशा होती परंतु आपल्याला काही कळालेच नाही अशा भ्रमामध्येच अमृता जगत होती. आता तिने तिच्या मनावर ताबा मिळवला होता कारण याआधी दोन वेळा तिला आपल्या पतीबद्दल असे काही प्रकरण कळाले होते तेव्हा तिने खूपच आकड तांडव केला होता. अशावेळी अमृताला समजवण्यासाठी आई आली होती तिला माहेरचं कोणीच असे व्यक्ती नव्हते की जी व्यक्ती तिला सांभाळू शकेल कारण की भाऊ कामानिमित्त परदेशात असायचा आणि आई म्हातारी असल्यामुळे ती फारशी धावपळ करू शकणारी नव्हती.

आपल्याकडे लक्ष देणारे सुद्धा कुणी व्यक्ती नव्हती म्हणून अमृता नेहमी एकटी पडायची. तिला भावनिक आधार देणारे असे कोणीच नसायचे. अमृताची आई तिला नेहमी सांगत असे तू जर वेगळे राहिले तर मुलाबाळांना कोण सांभाळेल. सर्व पुरुष अशीच असतात. थोडेसे मनावर दगड ठेवून तू वाग. जर तू वेगळी राहिली राहशील तर पुढे काय होईल? तुझे भविष्य कसे राहील ?? असे वेगवेगळे समजुती काढून तिची आई अमृताला राजी करत असे आणि याच गोष्टीचा फायदा राज घेत असे.

असे करत करत अमृता प्रत्येक गोष्टीतून तडजोड करत होती आणि या सगळ्या गोष्टींमध्येच राजन तिच्या मनातून हळूहळू उतरू लागला होता. असे करत करत खूप दिवस गेले. आता मुलेबाळे सुद्धा मोठी होत होती परंतु सर्व सोडून नोकरी करावी एवढा कॉन्फिडन्स सुद्धा तिच्या मनामध्ये नव्हता कारण की जेव्हा गरज होती तेव्हा ती नोकरी सोडून मुलांच्या भविष्यासाठी घरामध्ये बसली होती आणि आता एखादी नोकरी करावी एवढा आत्मविश्‍वास सुद्धा तिच्या मनामध्ये उरला नव्हता.

बाकी काही गोष्टी करता येतात की नाही परंतु इथे राहून राजन ला आपल्याला अद्दल घडवायची आहे असा तिने विश्वास मनाशी बांधला होता. राजनशी गोड बोलून घरातील वातावरण बिघडू न देता तिला राजनसोबत सूड द्यायचा होता. आजकाल ती राजनशी कमी बोलायला लागली होती.कोणताही वादविवाद न करता शांतपणे स्वतःमध्ये व्यस्त असलेली असायची आणि नेहमी कोणाशी तरी फोनवर बोलत बसायची. एक दिवशी राजनी तिला फोनवर बोलताना ऐकले तेव्हा ती हसत हसत बोलत होती एक दिवशी फोनची बेल वाजते आणि फोन ला लॉक सुद्धा नव्हता आणि अचानक फोन वाजला तेव्हा अमृता धावत धावत आली आणि फोनच्या स्क्रीनवर नाव होते मानस कॉलिंग…

तिने फोन उचलला आणि हसत हसत ती बोलू लागली आणि बेडरूम मध्ये गेली साधारण एक तास तरी फोन चालू होता. बेडरूम मधून मोठमोठ्याने असताना आवाज बाहेर येऊ लागला.. अशावेळी राजन हा ऐकत होता पण राजन ला यावेळी काही बोलता सुद्धा येत नव्हते आणि काही विचारता सुद्धा येत नव्हते परंतु त्यांचे सर्व लक्ष त्या फोनवर होते. अमृता काय बोलते आहे या सर्व गोष्टीवर त्याचं लक्ष होतं. मात्र यापुढे मानस१ मानस २, मानस ३ असे नंबर स्क्रीन वर दिसू लागले होते वेगवेगळ्या नंबरने तिला फोन करत असे. फोन वर बोलल्यानंतर आमृता नेहमी आनंदी दिसायची.

तिच्या वागण्यामध्ये सुद्धा फरक जाणवत होता. हे सगळं जाणून आणि पाहून राजनला आतून तुटल्यासारखे वाटत होते परंतु राजन आता हे सगळे नेमके प्रकरण काय आहे याबद्दल विचारपूस सुद्धा करू शकत नव्हता. आता आपल्याला हे सगळे वाचून वाटत असेल की अमृताचे बाहेर काहीतरी प्रकरण आहे परंतु तसे काहीच नव्हते. अमृता नेहमी आपल्या आईशी, बहिणीशी आणि जवळच्या मैत्रिणीशी बोलत होती परंतु तिने नंबर मात्र वेगळ्या नावाने सेव्ह केलेला होता. राजन जसा जसा टेन्शनमध्ये येत होता तसा तसा तिच्या मनाला समाधान आणि सुख लाभत होते.

राजन ला वाटणारी असुरक्षितता पाहून अमृता आता आनंदी राहू लागली होती कारण की तो तिच्याबद्दल कुठेतरी असुरक्षितता फील करत होता आणि आता राजन आपल्या आईला सुद्धा ह्या बद्दल काही विचारू शकणार नव्हता परंतु या सगळ्या गोष्टींची होणारी घालमेल अमृताला कळत होती परंतु अमृताने कोणत्याही प्रकारचा चेहऱ्यावर हावभाव न दाखवता हे पुढे सुरू ठेवले आणि पुढे काय करायचे याबद्दलचा निर्णय घेण्याची तयारी दाखवली. तिने वाईट न कृत्य करता धडा शिकवलं.. आपण कमेंटमध्ये पुढे काय होईल सांगा.. आपल्या प्रतिक्रिया द्या.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!