Home / आरोग्य / जेवणानंतर फक्त एक चमचा घ्या, गॅस, अपचन, पित्त व पोटदुखी सारखे आजार दूर होतील.

जेवणानंतर फक्त एक चमचा घ्या, गॅस, अपचन, पित्त व पोटदुखी सारखे आजार दूर होतील.

खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन न झाल्यास वारंवार गॅस होणे, पित्त होणे, अपचन व पोटदुखी सारखे आजार होतात. नेहमी असे म्हणले जाते की, उत्तम आणि निरोगी आरोग्याचा मार्ग हा आपल्या आहारातून व पोटातून जातो. आपलं पोट चांगलं असेल तर आपलं आरोग्य उत्तम राहते. कोणत्याही औषधांची गरज आपल्याला पोट साफ ठेवण्यासाठी पडत नाही. आपलं पोट व्यवस्थित असावं यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करायला हवेत. आपल्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर करण्यासाठी हा एकदम साधा व घरगुती उपाय आपण नक्की करा.

सामग्री-
१. एक चमचा जीरे
२. पाव चमचा ओवा-
ओवा आपल्या शरीरातील पचन क्रिया व्यवस्थित ठेवतो. शरीरात उष्णता वाढल्यास ती ओव्याच्या साहाय्याने कमी करता येते.
३. पाव चमचा पांढरे तीळ-
४. काळे मीठ (चवीनुसार) – काळे मीठ नसल्यास सैंधव मिठाचा वापर केल्यासही चालेल.

कृती-
१. जीरे, पांढरे तीळ, ओवा आणि मीठ यांना व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्या.
२. हेच एकत्रित केलेलं सारण आपल्याला औषध म्हणून वापरायचे आहे.

खाताना फक्त एक सपाट चमचा इतकंच खायचं आहे. वर दिलेलं प्रमाण हे योग्य आहे. आपण बनवताना घरातील माणसांच्या संख्येनुसार व आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. या मिश्रणाचे सेवन मुकवास म्हणून रात्रीच्या जेवणानंतर करू शकता. फक्त हे मिश्रण खाल्ल्यावर आपल्याला १० मिनिटे पाणी प्यायचं नाही. मात्र जेवण झाल्यावर लगेच एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे.
शतपावली करताना एक चमचाभर हे मिश्रण तोंडात टाकल्यावर आपला वेळही लवकर जाईल आणि औषधी उपाय देखील करून होईल.

पचन व्यवस्थित न झाल्यास पित्त, ऍसिडिटी, गॅस, अपचन, उष्णता यांसारखे आजार होतात व आपला दिवस खराब होत नाही. बऱ्याचदा अश्या प्रकारच्या लहान सहान आजारांनी आपली चिडचिड होते व कामावर लक्ष लागत नाही. हा उपाय अगदी साधासोपा आहे व पोटाच्या सर्व समस्या व तक्रारी दूर करणारा आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करून पाहा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!