Home / Motivation / फोटो बघून लोक समजत होते गावतली गरीब, अशिक्षित मुलगी असेल, पण निघाली आईपीएस ऑफिसर.. जाणून घ्या काय आहे प्रकरण……

फोटो बघून लोक समजत होते गावतली गरीब, अशिक्षित मुलगी असेल, पण निघाली आईपीएस ऑफिसर.. जाणून घ्या काय आहे प्रकरण……

बदलत्या काळाप्रमाणे माणसांमध्ये देखील तसेच बदल होऊ लागले आहेत. मॉडर्न बनण्याच्या नादात, दररोज नवनवीन येणाऱ्या फॅशन ट्रेंडच्या नादात लोक इतके आंधळे होऊ लागले आहेत की, आपल्या परंपरा व रूढी विसरत चालले आहेत. बदलत्या वेळेसोबत बदलणे किंवा नवीन फॅशन साकारणे काही चूक नाही पण आपण पद आणि पैसा या गोष्टी जवळ आल्या की कधी गर्व नाही केला पाहिजे. पण आजकाल दुनिया दिखाव्या वर चालते. अशात साधे आणि सरळ लोक खूप कमी पाहायला मिळतात. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला राजस्थानच्या अशाच एका साध्या व सरळ महिला IAS अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत.

या महिला आईएएस चे नाव मोनिका यादव असे आहे. त्या राजस्थान मधील सीकर जिल्ह्यातील श्रीमाधोपुर तहसील मधील लिसाड़िया या गावात राहणाऱ्या आहेत.सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आयएएस मोनिका राजस्थानच्या पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे, त्या फोटोत त्यांच्या कपाळावर बिंदी आणि मांडीमध्ये एक नवजात बाळ आहे. मोनिका यादव या २०१४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

त्यांचे फोटो जर कोणी पहिल्यांदा बघितले तर पाहिल्यानंतर कोणालाही असेच वाटेल की, त्या गावातील एक अशिक्षित महिला आहे, परंतु सत्य हे आहे की त्या एक महिला आयएएस अधिकारी आहेत. आपल्या फोटोद्वारे त्यांनी लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही कितीही शिकलेले असू द्या ,कितीही मोठे पद धारण केलेले असाल तरी तुम्ही आपली संस्कृती आणि परंपरेसोबत जुडलेली गाठ कधीही सोडू नका किंवा त्यांना विसरू नका. एका गावात जन्माला आल्यामुळे मोनिका देखील पूर्णपणे ग्रामीण वातावरणात वाढलेली आहे. त्याच्या वडिलांचे नाव हरफूल सिंह यादव असून, ते आयआरएस या सेवेमध्ये कार्यरत आहेत.

वडिलांकडून प्रेरणा घेऊन मोनिकाला देखील नागरी सेवेत रुजू होण्याची इच्छा निर्माण झाली आणि नंतर तिने स्वतः मेहनत करून यूपीएससी च्या परीक्षेत ४०३ वा क्रमांक मिळवला आणि ती तिच्या पहिल्या प्रयत्ना मध्येच यशस्वी झाली. सध्या मोनिका तिरवा येथे डीएसपी म्हणून कार्यरत आहे. मोनिका नेहमी आपल्या परिसरातील लोकांच्या तक्रारी ऐकत असते आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर देते. मोनिकाच्या या कार्यासाठी पुरस्कार देखील मिळाला आहे. मोनिका यांचे लग्न आयएएस अधिकारी सुशील यादव यांच्याशी झाले आहे.

मोनिका चे पती सध्या राज समंद मध्ये SDM म्हणून कार्यरत आहे. जेव्हा मोनिकाने तिच्या मुलीला जन्म दिला होता, तेव्हाचे तीचे फोटो देखील लोकांमध्ये खूप व्हायरल झाले होते. मुलीला संभाळण्यासोबतच तिने नोकरीच्या जबाबदाऱ्याही उत्तम प्रकारे पार पाडली. मोनिका नेहमीच आपल्या संस्कृती आणि परंपरेशी जुडलेली असते.

आणि अशाप्रकारे, आयएएस मोनिका आपली संस्कृती आणि परंपरा सोबत जुडलेली असून ती खऱ्या देशभक्त होण्याचे कर्तव्य पार पाडत आहे. तिच्या देशभक्तीमुळे संपूर्ण देशाला तिचा अभिमान आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!