Home / आरोग्य / वाढत्या वयामुळे होणाऱ्या कंबरदुखी, गुडघेदुखीवर हे 2 प्रकारचे दाणे उपाय ! पैसे तर वाचतीलच पण झटपट मुक्तता.

वाढत्या वयामुळे होणाऱ्या कंबरदुखी, गुडघेदुखीवर हे 2 प्रकारचे दाणे उपाय ! पैसे तर वाचतीलच पण झटपट मुक्तता.

फक्त या मिश्रणाचा वापर करा आणि घरच्या घरी कंबरदुखी, गुडघेदुखी यासारखे असंख्य समस्यांपासून सुटका.जर तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी,सांधेदुखी यासारख्या किती जुन्या समस्या असतील तर या समस्या दूर करण्यासाठी घरच्या घरी करता येणारा एक उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

हा उपाय केल्याने आपल्या सगळ्या समस्या दूर होणारच आहे पण त्याच बरोबर आपल्या शरीरातील हाडे मजबूत होऊन कॅल्शिअम ची मात्रा सुद्धा वाढणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपण जे काही साहित्य वापरणार आहोत ते साहित्य आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते आणि हा उपाय करण्यासाठी जे पदार्थ वापरलेले आहेत ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपण सर्वप्रथम मेथीचे दाणे वापरणार आहोत.

मेथीचे दाणे मध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषकतत्व उपलब्ध असतात त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम उपलब्ध असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे जिरे. जिरे सुद्धा आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होता जिरे हे अँटी ऑक्सीडेंट म्हणून आपल्या शरीराला उपयुक्त ठरते व त्याचबरोबर यामध्ये अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात. जर तुमचे वजन वाढले असेल तर ते वजन कमी करण्यासाठी जिरे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते कारण की जिरे नियमितपणे जिरे खाल्ल्याने आपली पचनसंस्था सुद्धा सुरळीतपणे कार्य करते.

हा उपाय करण्यासाठी आपण तिसरा पदार्थ वापरणार आहोत ते म्हणजे काळे मिरी . यामध्ये पेपरीन नावाचे घटक तत्व उपलब्ध असते,हे आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असते. या घटकामुळे आपल्या शरीरातील किती ही भयंकर वेदना असेल तर ती वेदना दूर करण्यासाठी मदत होते. आता हे तिन्ही पदार्थ आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि त्यांची पावडर बनवायची आहे. ही पावडर तयार झाल्यानंतर एक चमचा पावडर आपल्याला कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित एकजीव झाल्यावर हे मिश्रण आपल्याला सेवन करायचे आहे.

या मिश्रणामध्ये आपण आपल्या चवीनुसार गुळाचा एक खडा सुद्धा टाकू शकतात जर तुम्ही मधुमेह रुग्ण असाल तर अशावेळी गुळाचा खडा न टाकता सुद्धा हे मिश्रण तुम्ही सेवन करू शकतात, अशा पद्धतीने आपण दिवसभरातून एकदा हे मिश्रण प्यायल्याने आपल्या शरीरातील गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी यासारख्या असंख्य समस्या पूर्णपणे दूर होणार आहे आणि त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते घटक बाहेर पडण्यासाठी सुद्धा मदत होणार आहेत म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपल्या शरीराचे आरोग्य चांगले ठेवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!