Home / आरोग्य / फक्त दोन दिवसात खाज-खूजलीचा मुळापासून नायनाट होईल, करा हा घरगुती उपाय.

फक्त दोन दिवसात खाज-खूजलीचा मुळापासून नायनाट होईल, करा हा घरगुती उपाय.

जर तुम्हाला नायटाचा त्रास होत असेल, सतत खाज येत असेल व त्याने चिडचिड होत असेल तर आजचा हा उपाय तुमच्यासाठी आहे. कित्येक प्रकारची औषधे खाऊन झाली, गोळ्या खाल्ल्या, विविध क्रिम लावल्या तरीही जर खाज जात नसेल किंवा फंगल इन्फेक्शन जात नसेल तर हा घरगुती उपाय नक्की करून पहा. बऱ्याचदा रासायनिक औषधांनी खाज तात्पुरती थांबते आणि पुन्हा चालू होते. हा उपाय नक्की करून पाहा, कितीही जुने फंगल इन्फेकशन असू द्या, झटक्यात बरे होऊन जाईल.

सामग्री-
१. लसूण- काही पाकळ्या.
जितक लसणाच महत्त्व आपल्या आहारात आहे, तितकंच महत्त्व त्याला आयुर्वेदात देखील आहे. त्याने विविध प्रकारचे चर्मरोग बरे होतात. लसणामध्ये Anti Bacterial आणि Anti Fungal गुणधर्म असतात जे विविध आजारांवर गुणकारी ठरतात. उन्हाळ्यात घामामुळे फंगल इन्फेकशन अजूनच खाज सुटते अशावेळी हे औषध फार उपयुक्त ठरते.

२. खोबरेल तेल-
“ई जीवनसत्त्व” ने भरपूर असलेल्या नारळ तेलाचे आपल्या त्वचेला अमाप फायदे आहेत. भरपूर त्वाचारोगांतील औषधांमध्ये याचा वापर केला जातो. फंगल इन्फेकशनमुळे देखील त्वचा बऱ्याचदा कोरडी राहते. खोबरेल तेलामुळे त्वचेतील कोरडेपणा लगेच निघून जातो.

कृती-
१. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या. एका भांड्यात टाकून चांगल्या कुटून घ्या. मिक्सरच्या साहाय्याने बारीक केल्यासही चालेल. त्यातून वस्त्रगाळ करून लसणाचा रस काढून घ्या.
२. रस काढून झाल्यावर तो एका वाटीत घ्या.
३. त्यामध्ये दोन चमचे खोबरेल तेल टाका. (लसणाचा रसाने त्वचेवर खूप जळजळ होईल, कारण ते इन्फेकशन कमी करते व बुरशी म्हणजेच फंगलला जाळून टाकते).
४. नारळ तेल आणि लसणाचा रस व्यवस्थित एकत्रित करून घ्या.

वापर-
१. औषधी लावण्यापूर्वी फंगल इन्फेकशन असलेली जागा कोमट पाण्याने धुवून घ्या.
२. त्यानंतर ती जागा टॉवेल किंवा कुठल्याही कापडाच्या साहाय्याने पुसून घ्या.
३. जागा साफ केल्यावर त्याठिकाणी तयार केलेलं औषध कापसाच्या साहाय्याने लावावे.
४. अर्ध्या तासानंतर औषध लावलेली जागा थंड किंवा लहान कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या.

खबरदारी काय घ्याल?
१. फंगल इन्फेकशन वर लावलेला हात साबणाने धुतल्याशिवाय शरीरावर इतर कुठेही लावू नका.
२. एकदा घातल्यावर कपडे पुन्हा स्वच्छ धुतल्याशिवाय घालू नका.
३. जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन असेल तर तुमचे कपडे इतरांच्या कपड्यांपासून दूर ठेवा.
४. कपडे धुताना पाण्यामध्ये डेटॉल नक्की टाका.
५. कपडे इस्त्री करून कोंदट वातावरणात ठेवताना त्याच्या आसपास कापूर आणि लवंग ठेवा ज्याने बुरशीची वाढ होत नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!