Home / आरोग्य / प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी हा काढा एकदा प्याच, दिसेल त्वरित फायदा…

प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी हा काढा एकदा प्याच, दिसेल त्वरित फायदा…

जर आपल्याला वाटत असेल की आपली प्रतिकारशक्ती उत्तम रहावी, श्वसनसंस्था उत्तम रहावी किंवा सर्दी, खोकला, ताप आणि कफ यासारखे आजार सतत होऊ नयेत. दमा अस्थमा सारखे त्रास आपल्याला होऊ नयेत किंवा तणाव वाढू नये तर त्यांनी आतापासूनच हा काढा घरामध्ये ठेवला पाहिजे व त्याचा वापरही रोज केला पाहिजे.

आपल्या परिसरात हमखास आढळणाऱ्या या दोन वनस्पतींपासून हा काढा बनवणार आहोत. हा काढा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
साहित्य-
१. पाणी
२. गुळवेल
३. तुळशीची पाने
४. लवंग
५. काळी मिरी

कृती-
१. सर्वात आधी गॅसवर एक कप पाणी गरम करायला ठेवा.
२. या पाण्यामध्ये तीन ते चार गूळवेलाच्या काड्या टाकायच्या आहेत. याचे प्रमाण अति होता कामा नये. गूळवेल मध्ये शक्तिशाली Anti- Inflamatory आणि anti oxident गुणधर्म असतात. कप, अस्थमा, सर्दी, कफ यासारखे आजार या गुळवेलीने बरे होतात. आजच्या या संसर्गजन्य वातावरणात आपल्याला गूळवेलाच्या औषधी गुणधर्माविषयी माहिती मिळालेलीच आहे. या काड्या पाण्यामध्ये कुटून बारीक करून टाकल्या तरी चालतात.

३. त्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये १०-१५ तुळशीची पाने टाकायची आहेत. पाने स्वच्छ धुतलेली असावीत. तुळशीच्या पानांमध्ये ‘व्हिटॅमिन क’ आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर तुळशीच्या पानांमध्ये Anti-bacterial, Anti-fungal आणि Anti viral गुणधर्म देखील असतात. उपाशी पोटी आपण दररोज तुळशीची तीन-चार पाने खाल्ल्यास सर्दी, ताप यांसारखे आजार होत नाहीत.
४. त्यांनतर आपल्याला यामध्ये तीन चार लवंगा टाकायच्या आहेत.
५. त्यानंतर चार-पाच काळ्या मिऱ्या टाकायच्या आहेत.
टीप- आयुर्वेदातील असो किंवा नसो कुठल्याही औषधांची मात्रा ही प्रमाणापेक्षा अधिक नसावी.

६. शेवटी आपल्याला यामध्ये एक चमचा हळद टाकावी.
७. हे मिश्रण आता १५ मिनिटं उकळून द्यायचं आहे. एक कप पाण्याचं अर्धा कप पाणी होईपर्यंत हे उकळू द्यायचं आहे.
८. उकळून झाल्यावर हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे.
९. हा काढा आपल्याला दिवसातून एकदाच घ्यायचा आहे. याचा वापर एकतर सकाळी उपाशी पोटी किंवा रात्री झोपताना करायचा आहे. काढा घेतल्यावर अर्धा तास काहीच खाऊ पिऊ नका.

शहरी भागात राहत असलेल्या लोकांना गूळवेल सहज उपलब्ध होत नाही. अशावेळी तुम्ही मेडिकल मध्ये उपलब्ध असलेले तुलसी-गिलोय ज्यूस घेऊ शकता. 30 मिली ज्यूस मध्ये 30 मिली पाणी मिक्स करून हा ज्यूस तुम्ही घेऊ शकता.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!