Home / Motivation / ह्या ३ गोष्टी सोडा,आजपासून आयुष्यातून टेन्शन, स्ट्रेस संपून जाईल जीवनात खूप यश प्राप्त कराल.

ह्या ३ गोष्टी सोडा,आजपासून आयुष्यातून टेन्शन, स्ट्रेस संपून जाईल जीवनात खूप यश प्राप्त कराल.

मित्रांनो या तीन सवयी ज्या व्यक्तीमध्ये असतात तो आयुष्यभर टेन्शन, ड्रेसस्ट्रेस, चिंता, काळजी मध्ये आयुष्य जगत राहतो. कारण या तीन सवयींचा गुणधर्म तान तनाव, स्ट्रेस निर्माण करण्याचा आहे. आयुष्यात सुख आनंद आणि समाधान पाहिजे असेल तर आजच या तीन सवयींचा त्याग करा. कारण ह्या तीन पैकी एक जरी सवय तुम्हाला असेल तरी तुमचे आयुष्य चांगले होऊ शकत नाही. चला तर मग आजच्या या आयुष्य बदलणार या लेखाला सुरुवात करुया.

पहिली सवय:- प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याची सवय मित्रांनो ही सवय असणाऱ्या लोकांना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण हवे असते कंट्रोल हवा असतो त्यामुळे त्यांची धडपड फक्त गोष्टींना लोकांना कंट्रोल करण्यासाठी चाललेली असते. बायकोवर कंट्रोल, ऑफिसमध्ये हाताखालच्या लोकांवर कंट्रोल, गर्लफ्रेंड वर कंट्रोल, बॉयफ्रेंड वर कंट्रोल आणि कंट्रोल करण्याच्या चक्कर मध्ये एवढं टेन्शन मद्धे राहतात की काही विचारू नका. मित्रांनो बारकाईने बघा तसं पाहायला गेलं तर आपला कंट्रोल फक्त दोन गोष्टींवर आहे. आपल्या विचारांवर आणि दुसरे म्हणजे आपल्या कृतीवर ॲक्शन वर याच्या व्यतिरिक्त आपल्या कुठल्याच गोष्टीवर कंट्रोल नाही.जास्तीत जास्त आपण लोकांवर प्रभाव पाडू शकतो. पण त्यांच्यावर कंट्रोल करू शकत नाही.

दुसरी सवय:- प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन अपेक्षा ठेवू नये मित्रांनो ह्या लोकांना सगळ्या गोष्टी परफेक्ट म्हणजे शंभर पैकी शंभर पाहिजे असतात. माझी बायको मला परफेक्ट पाहिजे शंभर पैकी 100,मला नोकरी परफेक्ट पाहिजे शंभर पैकी शंभर, मला घर परफेक्ट पाहिजे शंभर पैकी शंभर, माझी मुले परफेक्ट पाहिजे शंभर पैकी शंभर ही लोक या परफेक्शन च्या चक्कर मध्ये कामे पुढे ढकलत असतात आणि सतत टेन्शन तान तनाव मध्ये आयुष्य जगत असतात. कारण जी गोष्ट हे शोधत असतात ती अस्तित्वातच नसते. त्यामुळे परफेक्शन हा एक प्रकारचा भ्रम आहे त्याच्या नादाला लागून आयुष्य खराब करू नका.  आणि सर्वात महत्वाचे कोणतेही काम चालू करण्यासाठी परफेक्शन ची वाट बघू नका.

तिसरी:- प्रत्येक कामामध्ये मजा-मस्ती शोधायची सवय मित्रांनो ही सवय असणाऱ्या लोकांना कोणतेही काम किंवा कृती करताना मजा पाहिजे असते. सुख पाहिजे असते आनंद पाहिजे असतो. तुम्ही म्हणाल यात काय चूक आहे मित्रांनो मित्रांनो कामांमध्ये आनंद शोधणे वाईट गोष्ट नाही. पण प्रत्येक काम मला आनंदच देईल ही अपेक्षा करणे वे’डेपणा आहे. तुम्ही वास्तवता बघा अभ्यास करण्यात खरच मजा येते का सकाळी चार वाजता उठायला तरच मजा येते का? व्यायाम करायला खरच मजा येते का व्हाट्सअप फेसबुक का सोडून आपल्या ध्येयाच्या दिशेने काम करायला खरच मजा येते का

या सोप्या गोष्टी असतात ते सगळेच करतात पण ज्या अवघड गोष्ट आहे ते फार कमी लोक करतात कारण त्या करताना काही मजा येत नाही पण जे लोक ह्या मज्या न येणाऱ्या गोष्टी करतात लोक आयुष्यात यशस्वी आणि श्रीमंत होतात आणि लोक प्रत्येक गोष्टीत मजा आनंद शोधतात स्ट्रेस तान तनाव मध्ये आयुष्य जगतात मित्रांनो ह्या होत्या त्या तीन सवय या तुम्ही सोडल्या तर तुमचे आयुष्य सुखाने आनंदाने आणि समाधानाने बनून जाईल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!